Saturday, July 6, 2024

राष्ट्रीय क्रीडा दिन | ‘या’ खेळाडूंच्या बायोपिकने प्रेक्षकांना लावले होते वेड

मंडळी आज म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय क्रीडा दिन (National sports day)साजरा करत आहोत. बॉलिवूड आणि क्रिकेटचे खूप जुने नाते आहे. अनेक खेळाडूंवर बॉलिवूडमध्ये बायोपिक बनल्या आहेत. ज्यातून खेळाडूंचा प्रवास आपण पहिला आहे. चला तर मंडळी क्रीडादिनी जाणून घेऊया असे काही चित्रपट ज्यात आपल्याला खेळाडूंची बायोपिक पाहायला मिळाली आहे. चला तर पाहुयात कोणते आहेत ते चित्रपट…

यादीतील पहिला चित्रपट सगळ्यांचा ओळखीचाच आणि खास म्हणजे आवडीचा. तो म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याची भूमिका निभावली होती.

बॉक्सर ‘मेरी कॉम’ यांचा प्रवास अभिनेत्री प्रियांका चोप्राने (priyanka chopra) अत्यंत सुंदर पद्धतीने साकारली. तिच्या बायोपिकचे नाव देखील मेरी कॉम असे होते. हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता.

बॅडमिंटन पटू सायना नेहवाल यांच्या आयुष्यावर आधारित सायना या चित्रपट आला होता. ही भूमिका अभिनेत्री परिणीती चोप्रा (pariniti chopra) हिने निभावली होती. तिचा हा चित्रपट देखील खूप गाजला होता.

धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने मिल्खा सिंग यांची भूमिका नियाभवली होती. त्यांचा हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता.

क्रिकेटपडू प्रवीण तांबे यांच्यावर देखील मी प्रवीण तांबे ही बायोपिक आली होती. या चित्रपटात मराठी अभिनेता श्रेयश तळपदे (Pravin tambe) याने प्रवीण तांबे यांची भूमिका निभावली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा-
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत
रक्षाबंधन स्पेशल! ‘हे’ कलाकार आपल्या भावा-बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

हे देखील वाचा