Saturday, March 2, 2024

तब्बल 20 पुन्हा मिळणार धम्माल मनोरंजनाचा डोस, ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचे शूटिंग सुरु

सन 2004 मध्ये नवरा माझा नवसाचा हा चित्रपट रिलीज झाला. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला सचिन पिळगावकर (sachin pilgavkar) आणि सुप्रिया पिळगावकर (Supriya pilgavkar) यांच्या जोडीने सगळ्यांचे मनोरंजन केले. आणि प्रेक्षकांनी देखील त्यांना खूप प्रेम दिले. आता या दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता लवकरच नवरा माझा नवसाचा 2 चे चित्रीकरण सुरू होणार आहे. याची माहिती मराठी अभिनेत्याने पोस्ट करून दिलेली आहे.

2004 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. आणि आता 2024 म्हणजे म्हणजे तब्बल वीस वर्षांनी आता याच्या दुसऱ्या भागाची चित्रीकरन सुरू करण्यात आलेले आहे. आणि हा भाग देखील सचिन पिळगावकर करणार आहेत.

याची माहिती जयवंत वाडकर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांनी नवरा माझा नवसाचा 2 साठी चित्रपटाच्या फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शन दिले आहे, “नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून सुरू होत आहे तुमच्या आशीर्वाद पाठीशी राहू द्या.”

ही बातमी वाचून त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद झालेला आहे. आता नवरा माझा नवसाचा चित्रपटात नक्की काय कहाणी पाहायला मिळणार आहे. याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिषेक बच्चनचा ‘हा’ पराक्रम पाहून अमिताभ बच्चन झाले भावूक ; म्हणाले, ‘मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो…’
जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयुष्मान खुराणाने केला पत्नीचा फोटो शेअर, लिहिले ‘हे’ खास कॅप्शन

 

हे देखील वाचा