हिंदी चित्रपट जगत हे प्रसिद्धी आणि पैसे मिळवण्याचे एक मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान सगळं काही मिळते. पण इथपर्यंत यायला आणि यशस्वी व्हायला मोठा संघर्ष करावा लागतो. या क्षेत्रात अनेक कलाकार आले आणि काहीही छाप न पाडता निघुण गेले त्यामुळेच हिंदी चित्रपट जगतावर खान मंडळींचे पहिल्यापासून वर्चस्व राहिले आहे. मात्र नवाझुद्दीन सिद्दीकीने (nawajuddin siddiqui)आपल्या दमदार अभिनयाने या हिंदी चित्रपट जगतात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळेच नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची आणि चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते. नवाझुद्दीन सिद्दीकीने या जगतात कसे यश मिळवले याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला होता. यावेळी त्याने त्याच्या कथा निवडीबद्दल अनेक रंजक खुलासे केले होते.
आपल्या यशाबद्दल अनेक खुलासे करताना नवाजुद्दीन म्हणतो की, त्याला पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावणे पसंद नाही. मी जेवढे प्रोजेक्ट केले ते मी सगळे माझ्या अभिनयाला शैलीला शोभतात का याचाच मी आधी विचार केला. आपल्या चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना तो म्हणतो की, मी २०० मधील फक्त पाच कथा माझ्यासाठी निवडल्या. यावेळी मला असेही विचारण्यात आले होते की तुम्ही ह्या कथा वाचल्यात की न वाचताच निर्णय घेताय.” आपल्या भूमिकांबद्दलही यावेळी नवाझुद्दीनने अनेक खुलासे केले.
याबद्दल बोलताना तो म्हणतो की, कोणत्याही चित्रपटातील भूमिकेत करारीपणा असला पाहिजे. त्या चित्रपटाच्या कथेत इतका दम नसला तरी चालेल पण भूमिका दमदार असावी. त्यामुळे कोणतीही भूमिका करताना मी त्यामधील डायलॉग पाहतो आणि त्यानंतरच माझ्यासाठी निवड करतो. जर मला कथा आवडली तर मी दिग्दर्शकाला मला पुढची कथा सांगायला लावतो किंवा घरी येऊन समजावून सांगा असे सांगतो. दरम्यान या अभिनेत्याला सुट्टीमध्ये इतरत्र फिरायला जाणे आवडत नाही. मी जेव्हा कामावर असतो तेव्हा ही आराम करु शकतो, कारण मी माझ्या कामाचा नेहमी आनंद घेतो. असेही तो म्हणतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा