Friday, March 29, 2024

Panchayat 2 | निर्मात्यांनी ठरलेल्या वेळेच्या आधीच का रिलीझ केली वेबसीरिज? ‘हे’ मोठे कारण आले समोर

यावर्षीची बहुप्रतिक्षित वेब सिरीज ‘पंचायत २’ नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच Amazon Prime वर रिलीझ झाली आहे. ही वेब सिरीज २० मे रोजी रिलीझ होणार होती. प्रेक्षकही या सिरीजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र आता दोन दिवस आधी चाहत्यांना या नव्या सिरीजचा आनंद घेता येणार आहे. चाहते खुश आहेत, कारण त्यांना आता शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्याचबरोबर काही लोकांच्या मनात असाही प्रश्न उपस्थित होत आहे की, सिरीज नियोजित वेळेपेक्षा लवकर का रिलीझ झाला?

अभिनेत्याने दिली माहिती
‘पंचायत २’ रिलीझ झाल्याची माहिती शोचा मुख्य अभिनेता जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, त्याने ही वेब सिरीज आता स्ट्रीम करता येणार असल्याचे सांगितले आहे. फोटोमध्ये जितेंद्र टीव्हीसमोर उभा असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी स्क्रीनवर पंचायत लिहिलेले दिसत आहे. (why did the makers release panchayat 2 before the scheduled time)

‘हे’ असू शकते कारण
ऍमेझॉनने ‘पंचायत २’ रिलीझ करण्यासाठी २० मे ही तारीख जाहीर केली होती. मात्र, रिलीझच्या दोन दिवस आधीच ओटीटी प्लॅटफॉर्मला आपली रणनीती बदलावी लागली. ही सिरीज ऑनलाइन लीक झाल्यामुळे ती वेळेआधीच लाईव्ह करण्यात आल्याचे मानले जात आहे. होय, ही सिरीज टेलिग्रामवर ऑनलाइन लीक झाली आहे. लीकची ही बातमी निर्मात्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती.

अनेक युजर्सनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली होती. यासोबतच काही लोकांनी ऍमेझॉनला असेही सुचवले होते की, त्यांनी संध्याकाळपर्यंत ‘पंचायत २’ रिलीज करावी. टेलिग्रामवर चित्रपट किंवा वेब सीरिज लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरं तर, या ऍपमध्ये कोणत्याही आकाराच्या फाइल्स पाठवता येतात. यामुळेच या ऍपवर अनेकदा चित्रपट किंवा वेब सीरिज लीक होतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा