बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल नवाझुद्दीन सिद्दिकीने दिली प्रतिक्रिया, केला त्याचा अनुभव शेअर

हिंदी चित्रपट जगतात नेपोटिझम म्हणजे परिवारवाद हा गाजलेला मुद्दा आहे. यावर अनेकदा चर्चा होताना दिसत असते. अनेकांनी बॉलिवूडमधील नेपोटिझमवर सडकून टिका केली आहे. मात्र काही जणांनी यावर प्रतिक्रिया देताना नेपोटिझम होत नसल्याचे म्हटले आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर हा मुद्दा चांगलाच चर्तेत आला होता. यावर आता अभिनेते नवाझुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin siddiqui) आपले मत व्यक्त केले आहे.

नवाझुद्दीन सिद्दिकी हा हिंदी चित्रपट जगतातील प्रतिभावान अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून येऊन त्याने चित्रपट जगतात लोकप्रियता मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये खान मंडळींच्या गर्दीतही आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकेचे नेहमीच कौतुक केले जाते. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना नवाझुद्दीन सिद्दिकीने हिंदी चित्रपट जगतातील परिवार वादावर आपले परखड मत व्यक्त केले आहे. यावेळी तो म्हणाला की, “बॉलिवूडमध्ये नेपोटिझम होतेच त्याचबरोबर वर्णभेदही मोठ्या प्रमाणावर होतो. मला एक अशी अभिनेत्री दाखवा, जी रंगाने काळी आहे. काळी लोक चांगला अभिनय करु शकत नाही का? मी सुद्धा काळा आहे, तरीही सुपरस्टार आहे. मी माझ्या मेहनतीने हे मिळवले आहे. अनेक अशा अभिनेत्री होत्या ज्या खूप चांगला अभिनय करु शकला असत्या मात्र यासाठी कष्टही घ्यावे लागते.”

या मुलाखतीत नवाझुद्दीन सिद्दिकीने त्याच्या संघर्षाबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी ‘काश्मिर फाइल्स’ चित्रपटाबद्दल विचारले असता त्याने “मी अजून हा चित्रपट पाहिला नाही मात्र लवकरच पाहणार आहे असे मत व्यक्त केले आहे,” या मुलाखतीत ‘काश्मिर फाइल्स’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना “याबद्दल मला माहित नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाला चित्रपटातून काहीतरी संदेश द्यायचा असतो तो ते देतात अशी प्रतिक्रिया नवाझुद्दीन सिद्दीकीने दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 भाभीजी घर पे है फेम रोहिताश गौड आहेत कोट्यवधी संपत्तीचे मालक, एका भागासाठी घेतात मोठी रक्कम

फिटनेस ट्रेनर विना शहनाझ गिलने केला मोठा बदल, सांगितल्या तिच्या फिटनेसच्या घरगुती ट्रिक्स

पैशाची हाव महागात पडते राव! स्क्रिप्ट न वाचताच राजेश खन्नांनी दिलेला चित्रपटाला होकार, पुढे झाली ‘अशी’ फजिती

Latest Post