Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रीने चित्रपटात दिले होते सर्वाधिक रेप सीन; वयाच्या २७ व्या वर्षीच झाला होता जीवघेणा आजार

‘या’ अभिनेत्रीने चित्रपटात दिले होते सर्वाधिक रेप सीन; वयाच्या २७ व्या वर्षीच झाला होता जीवघेणा आजार

चित्रपटसृष्टीत अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले नाव तर कमावले, पण अगदी लहान वयातच जगाचा निरोप घेतला. आजच्या पिढीने क्वचितच अभिनेत्री नाझिमा यांचे नाव ऐकले असेल. पण 60-70 च्या दशकात नाझिमा यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय नाझीमाने चित्रपटांमध्ये बलात्काराचे सर्वाधिक सीनही केले आहेत. पण त्यांना अगदी लहान वयातच जीवघेणा आजार झाला होता. आज आम्ही तुम्हाला नाझिमा यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

सत्तरच्या दशकात नाझिमा जवळजवळ प्रत्येक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारताना दिसल्या. कधी त्या हिरोची बहीण बनायच्या, तर कधी हिरोईनची. बहुतेक लोकांना सईइडच्या भूमिकेतून ओळख मिळत नाही, पण नाझिमाचा भोळेपणा आणि साधेपणा पडद्यावर प्रेक्षकांना खूप पसंत पडला. नाझिमाने एक साईड रोल साकारून आपली ओळख निर्माण केली होती. पुढे असे झाले की, प्रेक्षकांनी त्यांना ‘बॉलिवूडची बहीण’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आणि यामुळे त्या प्रसिद्ध झाल्या.

याशिवाय चित्रपटांमध्ये बलात्काराचे सर्वाधिक सीन नाझिमाने दिले आहेत. 60-70 चे दशक हा काळ असा होता, जेव्हा स्त्रियांवरील सामाजिक अत्याचार पडद्यावर दाखवला जायचा. अशा परिस्थितीत, अशा भूमिकांसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत नाझिमा असायच्या. नाझिमाने चित्रपटांमध्ये अशा अनेक भूमिका केल्या आणि यामुळे त्यांना ओळख देखील मिळाली.

सन 1972मध्ये आलेल्या ‘बेईमान’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते. नाझिमाने त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण 30 चित्रपटांत काम केले. त्यानंतर त्यांना कर्करोगाचा एक आजार झाला. 1975 साली याच आजारामुळे नाझिमा वयाच्या 27 व्या वर्षी जग सोडून गेल्या. अगदी लहान वयातच त्यांनी बॉलिवूडमध्ये चांगले स्थान मिळवले. बाल कलाकार म्हणून नाझिमाने ‘देवदास’ चित्रपटातही काम केले होते.

नाझिमाच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी ‘निशान’, ‘आरजू’, ‘दिल्लगी’, ‘तमन्ना’, ‘अनजाना’ यांसारख्या चित्रपटात सहाय्यक भूमिका केल्या आणि बहुतेकदा बहिणीच्या भूमिका साकारल्या. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयार-ए-मदिना’ चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

-सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा