Monday, July 1, 2024

सुशांत सिंग राजपूतच्या ९ महिन्यापासून फरार शेजाऱ्यावर एनसीबीची झडप, ठोकल्या बेड्या

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूच्या इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा अं’मली पदार्थाचे प्रकरण चर्चेत आले आहे. सुशांतच्या मृत्यूच्या वेळीही अनेकांना अं’मली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. बॉलिवूडमधील अनेक कनेक्‍शनही समोर आले होते. पण काळाच्या ओघात सर्व काही शांत झाले होते. पण पुन्हा एकदा अं’मली पदार्थाचे हे प्रकरण चर्चेत आले आहे. सुशांतशी संबंधित अं’मली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दुबईचा अं’मली पदार्थ लॉर्ड साहिल शाह उर्फ ​​फ्लाको याला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या साहिलच्या शोधात होती.

अं’मली पदार्थ पुरवठ्यात आले नाव
दिवंगत सुशांतचा शेजारी साहिल शाह याचे नाव तेव्हा पहिल्यांदा समोर आले, जेव्हा एजन्सीने अं’मली पदार्थाच्या पुरवठ्याच्या संदर्भात करण अरोरा आणि अब्बास लखानी या पहिल्या दोन आरोपींना अटक केली. माध्यमांतील वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, साहिल शाह अं’मली पदार्थ तस्करांमार्फत सुशांतसह बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध लोकांना अं’मली पदार्थ पुरवायचा.

३१० ग्रॅम गांजाची केली जाईल चौकशी
ते पुढे म्हणाले की, साहिल शाहने बुधवारी (२६ जानेवारी) एनसीबीसमोर आत्मसमर्पण केले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०२१ मध्ये अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींची ३१० ग्रॅम गांजा जप्त केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल.

फ्लॅटवर टाकला छापा
विशेष म्हणजे गणेश शेरे आणि सिद्धांत अमीन यांना अटक केल्यानंतर एनसीबीने साहिल शाहच्या फ्लॅटवर छापा टाकला, मात्र तो फरार झाला. सुशांत सिंग राजपूत १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गूढ परिस्थितीत मृत सापडला होता.

अनेक महत्त्वाची माहिती येऊ शकते समोर
अं’मली पदार्थ तस्कर साहिल शाह इलियास फ्लाकोच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. एनसीबीने फ्लाकोची काय चौकशी केली, हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु जी पाने अद्याप उघडली गेली नाहीत, ती उघडण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा