नीना गुप्ता यांना लोक म्हणायचे ‘निर्लज्ज’, अभिनेत्रीने ऑटोबायोग्राफीमध्ये केला धक्कादायक खुलासा


बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. त्या त्यांच्या चित्रपटासोबतच त्यांची ऑटोबायोग्राफी ‘सच कहू तो’ यामुळे सध्या चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी त्यांच्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला आहे. त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला आहे.

नीना गुप्ता या त्यांच्या चित्रपटातील अभिनयामुळे आणि त्याच्या भूमिकेमुळे लोकप्रिय आहेत. त्यांच्या ‘सच कहू तो’ या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी चांगल्या- वाईट गोष्टींचा खुलासा केला आहे. एकेकाळी त्यांना लोक ‘ताई’ (बहनजी) आणि ‘निर्लज्ज’ म्हणत होते. नीना गुप्ता‌ यांनी त्यांच्या पुस्तकात हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या की, कशाप्रकारे या गोष्टी त्या महिलांशी जोडलेल्या होत्या, ज्यांना इंग्रजी ही भाषा बोलता येत नव्हती.

एवढंच नाही, तर नीना गुप्ता यांनी पुस्तकात लिहिले आहे की, या शब्दांचा प्रयोग त्यांच्यावरही होत होता. जेव्हा त्या भारतीय साडी आणि पंजाबी ड्रेस घालत होत्या. त्यांनी सांगितले की, ‘ताई’ आणि ‘निर्लज्ज’ हे दोन शब्द त्यांच्या आयुष्यात स्पष्ट राहिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतेच नीना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी लाँच केली आहे. कोरोना विषाणूमुळे ही ऑटोबायोग्राफी लाँच करण्याची तारीख पुढे ढकलली होती. नीना गुप्ता यांनी हे पुस्तक मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लिहिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. त्यांनी हे देखील सांगितले होते की, करीना कपूर खान हे पुस्तक लाँच करणार आहे आणि यासाठी त्या खूप उत्सुक आहेत.

नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहू तो’ या पुस्तकात त्यांच्या करिअरमधील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या लहानपणीच्या आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या दिवसांबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकात कास्टिंग काऊचबद्दल देखील सांगितले आहे. या सोबत चित्रपट सृष्टीतील राजकारण, प्रेग्नेंसी आणि सिंगल मदरबाबत माहिती दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.