गरीब मुलांना पैसे वाटत होती नेहा कक्कर, अचानक घडलं ‘असं’ की चांगलीच घाबरली गायिका


बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. कधी जर ती सोशल मीडियावर सक्रिय नसली, तर तिचे व्हिडिओ फॅन पेजवर व्हायरल होऊ लागतात. नुकताच नेहाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अस्वस्थपणे रडताना दिसत आहे. नेहाचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत.

नेहाला घेरले मुलांनी
नेहाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे, जिथून नेहा जेवण करून बाहेर आली होती. नेहा तिच्या कारमधून जात असताना अचानक काही मुले तिथे आली आणि त्यांनी आवाज करायला सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये नेहा मुलांना पैसे देताना दिसत आहे. (singer neha kakkar was giving 500 rupees note to beggars singer cried)

पाणावले नेहाचे डोळे
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही मुले नेहाकडे पैसे मागत होती, तेव्हा बॉडीगार्ड तेथे आला. गार्डने मुलांना काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच आरडाओरडा सुरू झाला. हे बघून एवढा गोंगाट झाला की, नेहाचे डोळे पाणावले. नेहा खूपच घाबरली आणि कारच्या खिडकीकडे पाठ करून बसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

चाहते संतापले
हा सगळा तमाशा तिथे उभे असलेले लोक कसे बघत होते, अशी नाराजी या व्हिडिओद्वारे चाहते व्यक्त करत आहेत. सेलिब्रिटींसमोर फिरत राहणाऱ्या पॅपराजींनी या घटनेदरम्यान मुलांना समजावून बाजूला का काढले नाही, असा सवाल चाहते करत आहेत. त्याचवेळी ही मुले भिकारी नसून, चोर असल्याचेही काही लोक सांगत आहेत. बरं, प्रकरण काहीही असो, पण नेहा कक्करला रडताना पाहून चाहत्यांना दु:ख झाले आहे.

नेहा कक्कर २४ ऑक्टोबर २०२० रोजी रोहनप्रीत सिंगसोबत विवाहबंधनात अडकली. दोघांच्या वयात खूप अंतर आहे, पण प्रेम असेल तेव्हा वयाच्या अंतराचा काहीच फरक पडत नाही. दोघे अनेकदा त्यांचे प्रेमाने भरलेले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

हेही वाचा – 


Latest Post

error: Content is protected !!