Saturday, June 29, 2024

नेहा आणि रोहनप्रीत पुन्हा एकदा करणार धमाल, गाण्याचा पहिला पोस्टर केला शेअर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही या दिवसात खूपच चर्चेत आहे. ती सध्या ‘इंडियन आयडल 12’ या शोमध्ये जज आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत अनेक बातम्या समोर येत असतात. ‘नेहू दा ब्याह’ आणि ‘खयाल रखीया कर’ या सुपरहिट गाण्यांच्या यशानंतर नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग हे पुन्हा एकदा त्यांच्या म्युझिक अल्बममध्ये एकत्र दिसणार आहेत. या म्युझिक अल्बमची घोषणा त्यांनी या गाण्याच्या पोस्टरसोबत केली आहे. त्यांच्या आगामी पंजाबी गाण्याचे नाव ‘खड तेनू मैं दस्सा’ हे आहे.

नेहा कक्करने त्यांच्या या गाण्याचा पोस्टर शेअर करून लिहिले आहे की, “तुमची नेहू आणि रोहनप्रीत यांच्या ‘खड तेनू मैं दस्सा’ या गाण्याचा पहिला पोस्टर.” या गाण्याच्या पोस्टरमध्ये दोघेही स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहे. ते दोघेही एका फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये दिसत आहेत. या पोस्टरवर नेहा कक्कर वर्सेस रोहनप्रीत सिंग असे लिहिले आहे.

नेहा कक्करच्या चाहत्यांना तिच्या या गाण्याचा पोस्टर खूपच आवडला आहे. तिच्या या पोस्टला 4 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. नेहाच्या या पोस्टरवर तिचा भाऊ टोनी कक्कर याने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “मी या गाण्याची खूप दिवसापासून वाट बघत होतो. आहाहा हे गाणे आणि त्याचा व्हिडिओ.” या सोबतच नेहा कक्करच्या एका चाहत्याने लिहिले आहे की,”नेहमी प्रमाणेच खूप सुंदर.”

हे गाणे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी गायले आहे. कप्तान यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत, तर अगम अजीम यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

याआधी आलेले नेहा आणि रोहनप्रीत यांचे ‘खयाल रखीया कर’ या गाण्याने सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घातला होता. नेहाने लग्नाच्या दोन महिन्यानंतर बेबी पंपसोबत फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेहाने सांगितले होते की, हा फोटो त्यांच्या म्युझिक व्हिडिओमधील आहे.

या दिवसात नेहा कक्कर सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’मधील स्पर्धकांसोबत मस्ती करताना तिचे अनेक फोटो समोर आले आहेत. नुकतेच नेहा या शोमधून सुट्टी घेऊन तिच्या लग्नाचा सहा महिन्याचा वाढदिवस साजरा केला होता. या खास प्रसंगातील अनेक फोटो तिने शेअर केले होते. हे फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “प्रत्येक दिवशी रोहन माझे मन जिंकतो. प्रत्येक नवीन दिवशी मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडते. तो मला रोज आय लव्ह यू म्हणतो पण मी आज त्याला म्हणते की, आय लव्ह यू मोर. तू खूप चांगला पती आहेस. तू माझ्या आयुष्यात असल्याने मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते. लग्नाच्या सहा महिन्याच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश

हे देखील वाचा