टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या समंथाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलीवूडला देखील वेड लावले आहे. आज तिची लोकप्रियता केवळ सौथपुरती नाही तर संपूर्ण जगात आहे. समंथाने तिच्या मेहनतीने आणि कष्टाने तिचे करियर घडवले आहे. याच समंथाचा बहुप्रतिक्षित असा ‘शकुंतलम’ सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र या सिनेमाला प्रेक्षकांनी अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही.
अशातच एका तेलगू प्रोड्युसरने समंथाच्या करियरबद्दल एक वक्तव्य करत तिच्यावर काही आरोप केले होते. त्याच प्रोड्युसरला आता समंथाने जोरदार उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी समंथाबद्दल प्रोड्युसर चिट्टी बाबू यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले. त्यांनी या मुलाखतीमध्ये दावा केला की सामंथाचे करियर आता संपले आहे. आता पुन्हा ती स्टारडम मिळवू शकत नाही. एवढेच नाहीतर ती आता लोकांकडून सहानभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे देखील सांगितले. सोबतच ती सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी तिच्या आजाराचा आणि हेल्थ कंडिशनचा वापर करत असल्याचे सुद्धा म्हटले आहे.
पुढे चिट्टी बाबू यांनी शकुंतलम वर भाष्य करताना म्हटले, “प्रत्येकवेळी भावना काम करतात असे नाही. जर भूमिका आणि सिनेमा चांगला असेल तर लोकं नक्कीच बघतील. मात्र विचित्र आणि काहीही लोकं बघणार नाही. मला आश्चर्य वाटते की, अभिनेत्रीचे पद गमावणारी समंथा शकुंतलम या भूमिकेसाठी योग्य कशी वाटली? शकुंतलम मध्ये मला काहीही रस नाही.”
चिट्टी बाबू यांच्या आरोपांना समंथाने देखील सणसणीत उत्तर दिले. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, “मी गुगलवर सर्च करत होती, की कसे लोकांच्या कानात केस उगवतात. त्यावर गुगलने उत्तर दिले लोकांमधील टेस्टोस्टेरोन मुळे असे होते.” सोबतच तिने हॅशटॅग वापरत जे सर्च केले त्याचा स्क्रिनशॉट देखील शेअर केला. मात्र नंतर पोस्ट डिलीट केली. आता लोकांनी अंदाज बांधला आहे की, तिने चिट्टी बाबूसाठी ती पोस्ट शेअर केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…