Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

…आणि अशाप्रकारे नेहाला मिळाली होती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘अंजली भाभी’ची भूमिका

टेलिव्हीजन इंडस्ट्री चित्रपटांइतकीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. प्रेक्षकांच्या दररोजच्या मनोरंजनासाठी टीव्ही व्यतिरिक्त दुसरा उत्तम पर्याय नाही. टीव्हीवर अनेक उतम्मोत्तम मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातीलच एक मालिका म्हणजे सोनी सबवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ होय. नुकतेच सर्वात जास्त काळ चालणाऱ्या या शोचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आले आहे. हा शो तर लोकप्रिय झाला सोबतच या शोने यात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.

या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. यातील अंजली मेहता हे पात्र सुद्धा खूप गाजले सतत आपल्या नवऱ्याला डाएट फूड खायला घालणारी आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणारी अंजली या सर्व पात्रांमध्ये वेगळी ठरली. या मालिकेत जुनी अंजली मेहता हे पात्र साकारणाऱ्या नेहा मेहताला याच मालिकेने नवीन ओळख मिळवून दिली. जवळपास १२ वर्ष अंजली मेहता ही भूमिका साकरणाऱ्या नेहाने काही महिन्यांपूर्वीच ही मालिका सोडली. आता तिच्या जागेवर सुनैना फौजदार या नवीन अभिनेत्रीने हे पात्र साकारले आहे.

बुधवारी (९ जून) नेहा मेहताचा ४३ वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती. ९ जून, १९७८ रोजी गुजरातच्या भावनगरमध्ये नेहाचा जन्म झाला. नेहाने २००१ साली आलेल्या ‘डॉलर बहू’ मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. मात्र, तिला लोकप्रियता २००८ साली आलेल्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने मिळवून दिली. या मालिकेत तिने साकारलेली अंजली भाभी सर्वानाच भावली. आज भलेही नेहाने मालिका सोडली असली, तरीही तिची लोकप्रियता आजही कायम आहे.

नेहाला तिच्या वडिलांनी अभिनयात करिअर करण्यासाठी तयार केले होते. तिचे वडील एक प्रसिद्ध गुजराती लेखक होते. नेहाने वोकल आणि ड्रामामध्ये डिप्लोमा केला असून, भारतीय शास्त्रीय नृत्यात मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची पदवी मिळवली आहे. नेहाने तिच्या अभिनयाची सुरुवात गुजराती नाटकांपासून केली.

हिंदी मध्ये नेहाने ‘डॉलर बहू’, ‘भाभी’, ‘किस देश में निकला होगा चांद’ आदी मालिकांमध्ये काम केले आहे.
या मालिकांनंतर तिने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. या मालिकेत तिने साकारलेली अंजली मेहता ही भूमिका मिळण्यामागे देखील एक रंजक किस्सा आहे. नेहा फिल्म मेकिंगचा कोर्स करण्यासाठी अमेरिकेला जाणार होती. तिची जाण्याची पूर्ण तयारी झाली होती, तेव्हाच तिला हा शो ऑफर करण्यात आला. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला हा शो करण्याचा सल्ला दिला. कारण ही मालिका गुजराती साहित्यावर आधारित होती, आणि नेहाचे वडील स्वतः लेखक होते आणि साहित्याशी जोडलेले होते. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार नेहाने ही भूमिका करण्याचे ठरवले.

नेहाने नुकताच हा शो सोडला आहे. शो सोडल्यानंतर आता नेहा काय काम करते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. नेहाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “हा शो मला मिळाल्यानंतर मी ही भूमिका योग्य पद्धतीने पार पडू शकेल का असा प्रश्न मला पडला होता. मात्र, मी त्यानंतर १२ वर्ष या मालिकेत काम केले. ही मालिका सोडल्यानंतर मला जाणवले की, मी अजून खूप काही करू शकते. आता मी गुजराती चित्रपटांमध्ये काम करत आहे. मी नुकतीच एका सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे.”

नेहाने मालिकेसोबतच ‘ईएमआय’ या सिनेमात देखील काम केले होते. तिने या चित्रपटात संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दारूचा वास लपवण्यासाठी धरम पाजी खाऊन यायचे कांदा; जाम वैतागलेल्या आशा पारेख यांनी केली होती थेट दिग्दर्शकाकडे तक्रार

-वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव

-अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार

हे देखील वाचा