Thursday, June 13, 2024

साऊथ तसेच बॉलिवूडमध्ये काम करून नेहा शर्माने कमवलंय नाव, वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया खास गोष्टी…

दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड चित्रपटात काम करून अभिनेत्री नेहा शर्माने तिची एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबत तिच्या डान्सने देखील तिने सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत असते. नेहा मंगळवारी (२१ नोव्हेंबर) तिचा ३६व्या वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

नेहा शर्माचा जन्म २१ नोव्हेंबर, १९८७ मध्ये झाला. नेहाने तिच्या करिअरची सुरुवात २००७ साली दाक्षिणात्य चित्रपट ‘चिरुथा’ मधून केली. परंतु या चित्रपटातून तिला जास्त यश मिळाले नाही. त्यानंतर तिने ‘कराडू’, ‘कृक’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने ‘कृ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती अभिनेता इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘क्या कूल है हम’, ‘यमला पगला दीवाना २’, ‘कीर्ती’, ‘तुम बिन २’, यांसारख्या चित्रपटात काम केले. तिने ‘तानाजी’, ‘एक संधी हिंदा सी’ या चित्रपटात काम केले. (Neha Sharma celebrate her birthday, let’s know about her life)

नेहाने ‘इलिगल’ या वेबसीरिजमध्ये काम केले. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. नेहा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील खूप आहे.

नेहाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिला जेवण बनवण्यास, वाचण्यास आणि डान्स करण्याची जास्त आवड आहे. ती कत्थक हा डान्स प्रकार शिकली आहे. तसेच तिला सालसा, हिपहॉप हे डान्स प्रकार येतात.

 

हेही नक्की वाचा-
माधुरी दीक्षितला मिळणार ‘हा’ खास पुरस्कार; अनुराग ठाकूर पोस्ट शेअर करत म्हणाले…
मालिकेत काम करून निया शर्माने कमावले नाव, हॉटनेसबाबत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टाकले मागे

हे देखील वाचा