Thursday, June 13, 2024

माधुरी दीक्षितला मिळणार ‘हा’ खास पुरस्कार; अनुराग ठाकूर पोस्ट शेअर करत म्हणाले…

माधुरी दीक्षित ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. माधुरी दीक्षितला “धकधक गर्ल” म्हणून ओळखले जाते. तिच्या नृत्याची शैली अत्यंत मोहक आणि उत्साहवर्धक आहे. तिने आपल्या नृत्याने अनेक हिंदी चित्रपटांना सुपरहिट बनवले आहेत. माधुरी दीक्षितने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक आव्हाने पार केली आहेत. तिच्या यशाची कहाणी तरुण पिढीसाठी एक आदर्श आहे. माधुरी दीक्षित ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अमूल्य ठेवा आहे. तिचे योगदान नेहमीच लक्षात राहील. या अभिनेत्रीने भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अभिनेत्रीने अशा काही भूमिका केल्या आहेत ज्यासाठी ती आजही लक्षात राहते. कधी मोहिनी बनून तर कधी चंद्रमुखी बनून माधुरी दीक्षितने लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले.

अतुलनीय प्रतिभेचे वरदान लाभलेल्या माधुरीला 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनोख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. गोव्यात आजपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2023) सुरू होत आहे . 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध श्रेणीतील 250 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (anurag thakur ) यांनी अभिनेत्रीला देण्यात आलेल्या या सन्मानाचा सोशल मीडियावर खुलासा केला.

 अनुराग ठाकूर यांनी पोस्ट करताना लिहिले की,”माधुरी दीक्षितने चार दशकांपासून तिच्या टॅलेंटने तिची एक वेगळी छाप पाडली आहे. ‘निशा’ पासून चंद्रमुखी पर्यंत, भव्य ‘बेगम पारा’ पासून ‘रज्जो’ पर्यंत, तिच्या अष्टपैलुत्वाला मर्यादा नाही. आज आम्हाला 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशा प्रतिभावान अभिनेत्रीला ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान करताना फार आनंद होत आहे.” (Union Minister anurag thakur post viral announces special award to madhuri dixit at 54th international film festival of india avn)

आधिक वाचा-
तुषार बघायचा करीनाची 12-14 तास वाट, स्टारकिड असूनही केले हाेते दुर्लक्षित
निखळ सौदर्यांची खाण पिवळ्या साडीत खुललं अक्षया चे रूप, फोटो पाहून चाहते सैराट

हे देखील वाचा