Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड आता घाबरायचं कामच नाही! 23 चित्रपट निर्मात्यांचा नेपोटिझमवर हल्ला; नवीन कलाकारांसाठी बनवला प्लॅटफॉर्म

आता घाबरायचं कामच नाही! 23 चित्रपट निर्मात्यांचा नेपोटिझमवर हल्ला; नवीन कलाकारांसाठी बनवला प्लॅटफॉर्म

बॉलिवूडमध्ये नेपोटिझम हा एक कळीचा मुद्दा आहे. याबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली असते. चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर अनेकदा नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. यापैकी एक नाव करण जोहरचेही आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने नेपोटिझमवर बोलताना अनेकदा करण जोहरचे नाव घेतले आहे आणि त्याच्यावर नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप देखील लावला आहे. तेव्हापासून हा मुद्दा वारंवार चर्चेत आला आहे. आता चित्रपटसृष्टीतील नवीन कलाकारांना संधी मिळावी म्हणून काही दिग्गज निर्मात्यांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबईतील फ्रेम्स फास्ट ट्रॅक इव्हेंटमध्ये इनिशिएटिव्ह न्यूकमर्सच्या (FICCI) लाँचची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत चित्रपटसृष्टीतील नवीन प्रतिभावान कलाकारांना संधी देण्यासाठी मदत केली जाणार आहे. यामध्ये नितेश तिवारी, राम माधवानी, राज निदीमोरु, कृष्णा डीके, अमित शर्मा, अभिषेक शर्मा, मृगदीप सिंग लांबा, इम्तियाज अली आणि अनीस बाज्मी यांच्यासह 23 चित्रपट निर्मात्यांनी पाठिंबा दिला आहे.

दिग्दर्शक अमित शर्मा (Amit Sharma) यांनी याविषयी माहिती देत सांगितले की, “इंडस्ट्रीमधून जे काही मिळवले आहे, ते परत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे नवीन अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, संगीत कलागुण आणि तंत्रज्ञ यांना व्यासपीठ मिळणार आहे.” अमित पुढे म्हणाले की, “इंडस्ट्रीला अधिक चित्रपट बनवण्याची गरज आहे आणि त्याचबराेबर नवीन प्रतिभांचीही.”

‘वाईट चित्रपट बनवण्यापेक्षा नवीन प्रतिभेला संधी देणं गरजेचं’
कृष्णा डीके यांनी सांगितले की, “ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये आम्ही प्रवास सुरू केला, त्यावेळी आम्हीही नवीन हाेताे. आम्ही न्यूकमर्ससाेबत शाेर इन दि सिटी बनवली हाेती. तरी ती फार शानदार हाेती. आमचे पाेस्टर चेहऱ्याहून अधिक कंटेंटवर भर देत हाेतं.”

नितेश तिवारी यांनी सांगितले की, “त्यांनी स्टारला स्टारच्या दृष्टीने बघणे बंद केलं. मी त्यांना कलाकाराच्या दृष्टीनेच बघताे. स्टार्सला लक्षात घेत मी कधी कटेंटवर लक्ष दिलं नाही.” दुसरीकडे, अनीस बाज्मी म्हणाले की, “काेणत्याही स्टार्ससाेबत वाईट चित्रपट बनवण्यापेक्षा नवीन प्रतिभेसाेबत चांगला कटेंट तयार करणे गरजेच आहे.”

हेही वाचा- ‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिकाचा सलमानसोबत झक्कास डान्स, ‘श्रीवल्ली’च्या इशाऱ्यांवर ‘दबंग खान’ने धरला ठेका

न्यूकमर्सला पाठिंबा देणाऱ्या चित्रपट निर्मात्यांमध्ये राजकुमार हिरानी, रोहित शेट्टी, सुकुमार, आशुतोष गोवारीकर, कबीर खान, गौरी शिंदे, आर बाल्की, आनंद एल राय, एआर मुरुगदौस, अश्विनी अय्यर तिवारी, अली अब्बास जफर, सिद्धार्थ आनंद, जगन शक्ती आणि विष्णुवर्धन यांचाही समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे बाप! ‘या’ अभिनेत्रीने रिकामी केली ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांची तिजोरी, बनली सर्वात महागडी स्पर्धक
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? 12 वर्षांच्या वयातच धरलेली अभिनयाची कास; तिचीच रंगलीय चर्चा

हे देखील वाचा