भारतातील सर्वात प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक, ‘नेटफ्लिक्स’ अनेकदा त्याच्या मनोरंजक वेब सीरिजमुळे चर्चेत असते. मात्र हे प्लॅटफॉर्म यावेळी एका दु:खद घटनेच्या वृत्तामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. खरं तर, नेटफ्लिक्स सिरीज ‘द चोजन वन’ची संपूर्ण टीम रस्ता अपघाताची शिकार झाली आहे. उत्तर-पश्चिम मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया सूर पेनिन्सुला प्रदेशात एका वाहनाचा अपघात होऊन, सीरिजमधील दोन कलाकारांचा मृत्यू झाला आहे. या वाहनातून संपूर्ण टीम एकत्र प्रवास करत होती, त्याचवेळी हा अपघात झाला.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी (१६ जून) एका वाळवंटाच्या परिसरात झाला. अपघातावेळी वाहन भरधाव वेगाने जात असताना, अचानक नियंत्रण सुटून ते पलटी झाले. या अपघातात दोन कलाकारांचा जागीच मृत्यू झाला, तर टीममधील इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. (netflix the chosen one series cast gets killed in crash accident)
अभिनेता रायमुंडो गार्डुनो क्रूझ आणि जुआन फ्रान्सिस्को गोन्झालेझ अग्युलर यांचा मृत्यू झाला असून, इतर सहा जण जखमी झाले आहेत. अशी माहिती बाजा कॅलिफोर्नियाच्या संस्कृती विभागाने शुक्रवारी (१७ जून) दिली.
नेटफ्लिक्स सीरिज ‘द चोजन वन’ ही १२ वर्षांच्या मुलाची कथा आहे. त्याला कळते की तो परत आलेला येशू ख्रिस्त आहे, जो मानवांचे संरक्षण करण्यासाठी पृथ्वीवर जन्माला आला आहे. ही सीरिज मार्क मिलर आणि पीटर ग्रॉस यांच्या कॉमिक बुकवर आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा