Thursday, July 31, 2025
Home अन्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार गुड न्यूज? माध्यमांमध्ये चर्चा रंगल्यानंतर स्वतःच केला खुलासा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार गुड न्यूज? माध्यमांमध्ये चर्चा रंगल्यानंतर स्वतःच केला खुलासा

सध्या मराठी तसेच हिंदी सिने जगतात अनेक अभिनेत्री गुड न्यूज देताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेत्री आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आता मराठी सिने जगतातही लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळणार असल्याची चर्चा सिने जगतात रंगली आहे. ही चर्चा सुरू आहे ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबद्दल.  मराठी सिने जगताची अप्सरा लवकरच गुड न्यूज देण्याची चर्चा तिच्या व्हायरल फोटोंमुळे सुरू झाली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

सोनाली कुलकर्णीही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही चांगलीच  सक्रिय असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशाच एका व्हायरल फोटोमुळे अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सोनालीच्या प्रेग्नेंसीची चर्चा होण्याचे कारण म्हणजे तिचे अलिकडेच केलेले नवीन फोटोशूट. सोनालीने अलिकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पोलका डॉट ड्रेस घातलेली दिसून येत आहे. या ड्रेसमुळेच सोनाली प्रेग्नेंट असल्याची चर्चा होत आहे. कारण याआधी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही असाच ड्रेस घालून फोटो शेअर करत आई होणार असल्याची बातमी दिली होती. त्याचप्रमाणे क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या पत्नीनेही असाच ड्रेस घालत गुड न्यूज दिली होती. यामुळेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे फोटोशूट म्हणजेच प्रेग्नेंसीबद्दलची हिंट असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. परंतु याबद्दल स्वतः सोनालीनेच खुलासा करत मी प्रेग्नेंट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या चर्चांना सध्यातरी फुलस्टॉप मिळाला आहे.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा तमाशा लाईव्ह चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये चांगलाच गाजत आहे. यामधील सोनालीच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे.

हेही वाचा –

रजनीकांत ते राम चरण, ‘या’ सुपरस्टार्सच्या सिनेमांसाठी आहात ना तयार? २०२३मधील उन्हाळ्यात करणार धुमाकूळ

अमिषा पटेल जाणार तुरुंगात? पाहा काय झालाय गंभीर आरोप

लंडनमध्येही जपलाय मराठी बाणा, दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा