बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांना आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी मागच्या वर्षी ‘वेड’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला. रितेश आणि जेनेलिया यांची जोडी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे मजेदार आणि विनोदात्मक व्हिडिओ नेहमीच चाहत्यांना आवडतात. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे त्यांना ट्रोलला सामोरे जावे लागले.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाने, बर्याच काळानंतर, त्याची पत्नी जेनेलियासोबत एक रील शेअर केली आहे. ज्याला इंस्टग्रामवर 6.4 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये ‘हाऊसफुल’ मजेशीर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियाला म्हणतो, “राजा दशरथला तीन बायका होत्या, त्यामुळे मीही तीन लग्न करू शकतो.” याला उत्तर देताना जेनेलिया त्याला द्रौपदीची आठवण करून देते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला अनेकांनी ट्रोल केले. काही लोकांनी म्हटले की, रितेश आणि जेनेलिया महाभारत आणि रामायण या पौराणिक कथांचा अपमान करत आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, “कृपया सनातनवर विनोद करणे बंद करा, अन्यथा तुम्हीही बॉयकॉटचे नाव ऐकले असते. आणखी एका यूजरने लिहिले की, “सर, हिंदू धर्मावर असे कॉमेडी व्हिडिओ बनवू नका, आम्ही तुमचा खूप आदर करतो.” ही माझी तुम्हाला विनंती आहे.”
View this post on Instagram
दरम्यान, 2003 मध्ये रिलीज झालेला ‘तुझे तेरी कसम’ हा जेनेलियाचा पहिला डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटातून तिच्यासोबत रितेश देशमुखनेही डेब्यू केला होता. या चित्रपटादरम्यान रितेश देशमुख जेनेलियाला पसंत करू लागला. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. (Netizens were furious after seeing the video of Riteish Deshmukh and Genelia)
आधिक वाचा-
–Breaking! प्रसिद्ध गायकाचे स्टेजवर गात असताना भर कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने निधन
–Urfi Javed : ‘या’ सेलिब्रिटीने थेट घातली उर्फी जावेदला लग्नाची मागणी; अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न करणार…’