Monday, March 4, 2024

रितेश देशमुख करणार राजकारणात एंट्री? देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याचे वडील दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघाचे आमदार आहेत. रितेश देशमुख सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या रितेश देशमुख एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेते रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार असे बोलले जात आहे. यावर माध्यमांशी बोलत असताना फडणवीस यांनी एक सूचना केली आहे.

टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘आपला बायोस्कोप 2023’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मराठी चित्रपटांचे बजेट कमी असले तरी त्याच्यातील सर्जनशीलता भारतातील इतर चित्रपटांपेक्षा कैकपटीने खूप आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे बजेट ऐकले की धडकी भरते. मराठीमध्ये बजेट कमी असले तरी मी दाव्याने सांगू शकतो की, जी सर्जनशीलता मराठी लोकांमध्ये त्यांच्या चित्रपट, मालिका आणि नाटकामध्ये आहे. ती इतर कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. विशेषतः मराठी रंगभूमीने या देशातील थिएटर जिवंत ठेवले आहे.”

यावेळी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख  (Ritesh Deshmukh) यांच्याकडे बोट दाखवत फडणवीस म्हणाले, “पुढच्यावर्षी आम्हाला या सोहळ्यात यायचे असेल तर रितेशजी तुम्ही राजकारणात (politics) यायचे नाही. ही पूर्वकल्पना आताच देतो आणि यायचे असेल तर कुठून यायचे, हे मी तुम्हाला सुचवतो.” सध्या फडणवीस यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या या वक्तव्यमुळे रितेश देशमुख चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान, रितेश देशमुखने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याने राजकारणात प्रवेश केला तर तो एक मजबूत उमेदवार ठरू शकतो. रितेश देशमुख यांचा राजकीय पक्ष कोणता असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्याच्या वडिलांनी काँग्रेस पक्षात काम केले होते आणि त्यामुळे तो काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतो, असे मानले जात आहे.रितेश देशमुख याचा राजकारणात प्रवेश हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. (Ritesh Deshmukh entry into politics Devendra Fadnavis valuable advice)

आधिक वाचा-
कडाक्याच्या थंडीत रणवीरनंतर आता ‘या’ अभिनेत्याने केले न्यूड फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाला…
किंग खानसह खिलाडी आणि सिंघम अडचणीत; ‘या’ प्रकरणी हायकोर्टाची नोटीस

हे देखील वाचा