Friday, July 5, 2024

भारीच की! ‘अरुदीप’चे नवं गाणं आलं रसिकांच्या भेटीला; त्यांच्या जुगलबंदीने पुन्हा केलं सर्वांना प्रभावित

सोनी टीव्ही वरील सर्वात गाजलेला शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ हा होता. याच शोची आवडती आणि सुपरहिट जोडी पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल ही होय. पवनदीप आणि अरुणिता यांचा खूप मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. अनेक चाहते त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. या जोडीला संपूर्ण देशातून खूप प्रेम मिळाले आहे. याच प्रेमामुळे पवनदीप या शोचा विजेता झाला, तर अरुणिता उपविजेती ठरली. हा शो संपला असला, तरी देखील त्यांच्या चाहत्यांना या दोघांबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. याच दरम्यान त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

पवनदीप आणि अरुणिता यांचे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. ‘ओ सैय्योनी’ हे शीर्षक असलेले हे गाणे पवनदीप आणि अरुणिता यांनी ‘हिमेश के दिल से’ या अल्बमसाठी गायले आहे. हिमेश रेशेमियाने हे गाणे लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. त्याचबरोबर हे गाणे रिलीझ होताच त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अरुणिता आणि पवनदीपची जुगलबंदी चाहत्यांना गाण्यात खूप आवडली आहे. हे रोमँटिक गाणे चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. चाहते गाण्याच्या संगीताचे तोंडभरून कौतुक करत आहेत. अरुणिता आणि पवनदीपच्या जादुई आवाजात गायलेल्या या गाण्याचा चाहते खूप आनंद घेत आहेत. यासोबतच चाहत्यांनी ही या गाण्याला सुपरहिट म्हटले आहे.

काही तासांत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या जोडप्याचे हे गाणे खूप आवडले आहे. गाणे रिलीझ झाल्यानंतर काही तासांतच त्याला १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यात अरुदीपच्या आवाजासोबतच दोघांचा लूकही चाहत्यांना आवडत आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांचे अधिकच दिवाणे झाले आहेत.

‘इंडियन आयडल’मधील रोमँटिक अंदाज
‘इंडियन आयडल १२’ मधील या दोघांची जोडी देखील चाहत्यांना चांगली आवडली. पवनदीप राजनने १२ वा हंगाम जिंकला असेल, पण अरुणिता कांजीलालने ही लाखो चाहत्यांची मने जिंकली. चाहत्यांनी त्या दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला होता. इंडियन आयडलच्या मंचावर आलेल्या प्रत्येकाने या जोडीला खूप प्रेम आणि आदर दिला. हा रियॅलिटी शो संपल्यानंतरही त्यांची जोडी तितकीच लोकप्रिय आहे.

पवनदीपने रोमँटिक व्हिडिओ केला शेअर
या अगोदर पवनदीपने अरुणितासोबतचा रोमँटिक अंदाजातील एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला होता. व्हिडिओमध्ये दोघेही ‘गजब का है दिन’ गाण्यावर नाचताना दिसले. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया बापटने केला लाडू बनवतानाचा व्हिडिओ शेअर; ‘हा’ कलाकार म्हणाला, ‘मला पण पाहिजे’

-‘आली गौराई अंगणी…’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री समिधाने सुंदर फोटो केले शेअर; एकदा पाहाच

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

हे देखील वाचा