दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हा त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून एकमेकापासून वेगळा झाला. तब्बल १८ वर्षांचं असलेलं नातं त्यांनी तोडून टाकलं आहे. आता ते एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. या दोघांच्या वेगळे होण्याचा परिणाम सुपरस्टार आणि ऐश्वर्याचे वडील रजनीकांत यांच्यावर होत आहे. आपल्या जावयाला आणि मुलीला पुन्हा एकत्र आणावं यासाठी ते अतोनात प्रयत्न करत आहे.
धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या (Aishwarya) यांच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं, हे गूढ अजूनही कायम आहे. लग्नानंतर आठ वर्षे एकत्र राहून त्यानंतर वेगळ होण्याचं कारण उलगडत नाहीये. चाहत्यांना देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे. या दोघांच्या वेगळे होण्याचा सर्वात जास्त त्रास रजनीकांत यांना होत आहे. त्यांची इच्छा आहे की, दोघांनी पुन्हा एकत्र यावं आणि पुन्हा संसार सुरू करावा.
याच महिन्यात १७ जानेवारीला धनुष आणि ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं जाहीर केलं होतं. धनुष आणि ऐश्वर्यानं त्यांच्या संयुक्त निवेदनात लिहिलं होतं की, “आम्ही मित्र, जोडपे, पालक आणि शुभचिंतक म्हणून १८ वर्षे एकत्र घालवली. हा प्रवास वाढीचा, समजूतदारपणाने, समायोजनाचा होता. आता आम्ही या टप्प्यावर उभे आहोत जिथून आमचे जीवन वेगळे होत आहे. आम्ही एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळेल. या निर्णयाचा आदर करा आणि त्यावर मात करण्यासाठी आम्हाला थोडी गोपनीयता द्या.”
विशेष म्हणजे, धनुषचे वडील म्हणाले होते की, कौटुंबिक वादामुळे ते एकमेकापासून वेगळे झाले.
हेही पाहा- ६०-७० च्या दशकात Bikini सीन्सने वाद निर्माण करणाऱ्या Bollywood अभिनेत्री
धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात वाद होण्याची ही पहिली घटना नाहीये. यांच्यामध्ये सतत मतभेद होत होते, दोघांमध्ये टोकाचे वाद होत होते आणि अनेकदा त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता, असे माध्यमांतून समोर आले आहे. परंतु प्रत्येक वेळी रजनीकांत यांनी हे मतभेद सोडवले होते. परंतु आता धनुष आणि ऐश्वर्या यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतीतही रजनीकांत (Rajinikanth) यांनी सार्वजनिक ठिकाणी काही भाष्य केलेलं नाही. परंतु ते दोघे एकत्र यावेत त्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा-