Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नासाठी तयार आहे सारा अली खान, परंतु नवरदेवाला मान्य कराव्या लागणार अभिनेत्रीच्या ‘या’ अटी

सारा अली खान ही बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिने स्वतःच्या हिंमतीवरआपले नाव कमावले आहे.पतौडी घराण्याचे नाव ,आजी शर्मिला टागोर, वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांचे बॉलिवूडमध्ये खुप मोठे नाव असूनही, ती नेपोटिज्मच्या वादापासून दूर राहिली. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. यात तिने सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले. तसेच साराने कार्तिक आर्यन, रणवीर सिंग या अभिनेत्यांसोबतही काम केले आहे. लवकरच अभिनेत्री अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत ‘अंतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिले गाणे रिलीझ झाले आहे. अलीकडेच साराने तिच्या आयुष्य आणि व्यक्तिमत्वासह, लग्नाबद्दल एक अट ठेवली आहे.

लग्नासाठी तयार आहे सारा
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओसोबतच, जेव्हा जेव्हा ती स्वतःबद्दल बोलते तेव्हा ती आपले विचार खूप मोकळेपणाने मांडते. अलीकडेच तिने एका वृत्तवाहिनीशी संभाषण केले. यावेळी तिने तिच्या लग्नाची एक मोठी अट तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर ठेवली आहे.

साराने ठेवल्या काही अटी
सारा तिच्या लग्नाबद्दल बोलताना म्हटली की, “मी अशा व्यक्तीशी मी लग्न करणार, जो माझ्या आणि माझ्या आईसोबत राहणार असेल.” हे अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी ती स्वतःच्या ‘अंतरंगी रे’ या चित्रपटातील डायलॉग म्हणते की, “एकाच वेळी मुलीला दोन्ही गोष्टी मिळाल्या त,” ती पुढे म्हणते की, या डायलॉगमधून ती सांगू इच्छिते की, आजच्या काळात जी वस्तुस्थिती आहे त्याची पूर्णपणे माहिती देणारा चित्रपट आहे.

एकट्या आईसाठी आयुष्य कठीण असते
अभिनेत्री पुढे म्हणते, की “मी लहानपणापासून माझ्या आयुष्यात बरेच काही पाहिले आहे. याच कारणामुळे मी लवकर मोठी झाले. मला नेहमीच माझ्या आई बरोबर राहायचे आहे. कारण एकट्या आईचे आयुष्य पूर्वीपेक्षा थोडे कठीण बनते.”

कोणाचे सल्ले घेते सारा
साराला विचारले गेले की, वडील सैफ अली खान किंवा आई अमृता सिंग या दोघांपैकी कोणाचे सल्ला घेण्यासाठी ती कोणाच्या मागे लागते. यावर उत्तर देताना तिने तिच्या आईचे नाव घेतले आणि सांगितले की, लहानातला लहान निर्णय असो किंवा मोठ्यातला मोठा, ती तिच्या आईलाच विचारते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा