दु:खद! हेमा मालिनी यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावुक होत पोस्ट केली शेअर


कोरोना व्हायरसमुळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन लावलेले असतानाही रोज मृत्यूचे तांडव सुरूच आहे. यातच आता बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित, परत एकदा वाईट बातमी समोर आली आहे. हेमा मालिनी यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. हेमा मालिनी यांचे सेक्रेटरी मकरंंद मेहता यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. याविषयीची माहिती अभिनेत्री, हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

त्यांनी भावुक होत लिहिले की, “जड अंतःकरणाने मी माझ्या ४० वर्षांपासून असलेल्या, माझ्या सेक्रेटरी यांचा निरोप घेत आहे. समर्पित, मेहनती आणि कधीही न थकणारे मेहता जी. ते माझ्यासाठी कुटुंबाचा भाग होते. आम्ही त्यांना कोरोनामुळे गमावले आहे. हे अपूर्ण नुकसान आहे, आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, जी कोणीच भरू शकत नाही.”

हेमा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्यांची मुलगी ईशा देओल, आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्यासह, अनेक सेलेब्रिटींनी मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ईशाने लिहिले, “आम्ही सर्व त्यांची खूप आठवण काढू. ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य होते. त्यांची जागा आता कधीच कोणी भरून काढू शकत नाही. ते आईसाठी सर्वोत्कृष्ट होते. किती समर्पित व्यक्ती होते. तुम्ही मला खूप आठवणार मेहता अंकल. त्यांच्या आत्मास शांती मिळो.”

रवीना टंडनने हेमा मालिनी यांच्या पोस्टवर “मनापासून संवेदना, ओम शांती,” असे लिहिले. सोबतच गायक पंकज उदास यांनी लिहिले आहे की, “आपणास आणि आपल्या कुटुंबियांस माझ्या मनःपूर्वक संवेदना. देवा त्यांचा आत्मास शांती मिळो. ओम शांती.”

कोरोनामुळे खूप कलाकारांनी गमावला आपला जीव
मनोरंजन क्षेत्राशी संबंधित बर्‍याच कलाकारांचे, आतापर्यंत कोरोनामुळे निधन झाले आहे. यामध्ये हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांची अभिनेत्री श्रीप्रदा, ‘छिछोरे’ या चित्रपटाची अभिनेत्री अभिलाषा पाटील, नदीम-श्रवण जोडी फेम संगीतकार श्रवण राठोड, ‘जीस देश में गंगा रहना है’ किशोर नंदलास्कर, सिनेमॅटोग्राफर के.व्ही. आनंद, संपादक वामन भोसले आणि ‘महाभारत’ या मालिकेत इंद्राची भूमिका साकारणारे सतीश कौल या सगळ्यांचा यात समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.