कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा खूप होता आहे. त्यांच्या सर्व फॅन्सला त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता लागलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांचं लग्न 9 डिसेंबरला बरवाडा येथे शाही पद्धतीने पार पडणार आहे. ह्या लग्नाला घेऊन आत्तापर्यंत कोणाकडेच काही इन्व्हिटेशन आलं नाही. लग्नाची शांतता एका बाजूला तर दुसरीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अशी देखील चर्चा आहे की कॅटरिना आणि विकी च्या लग्नात खास पाहुण्यांना येणार आहेत. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना कॅटरिना आणि विकी काही अटी लागू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कॅटरिना आणि विकी खूप टेन्शन मध्ये आहेत. यांच्या लग्नामध्ये आमंत्रित असलेल्या एका पाहुण्याने यांच्या लग्नाची बातमीचा उघडकीस आणली . त्यामुळेच लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांवर ते काही अटी लागू करण्यात आले आहेत. आणि यांच्या लग्न मध्ये फोटो काढण्यास बंदी आहे आणि फोनवर ही बंदी आहे. कॅटरिना आणि विकी हे पहिले कपल नाही ज्यांनी अशा अटी लागू केल्या आहेत.बॉलिवूडमधील अनेक स्टार्सने त्यांच्या लग्नामध्ये काहीना काही अटी लागू केल्या होत्या. पाहुयात कोण कोण होते ते स्टार

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली येथे लग्न केले. त्यांनी इटलीमध्ये फेअरी टेल वेडिंगच प्लॅनिंग केलं होतं. लग्नामध्ये पाहुण्यांना फोन वापरण्यास बंदी होती. कारण त्यांच्या लग्नाचे फोटो बाहेर जायला नको म्हणून त्यांनी ही बंदी लावली होती. हे सर्व करूनही अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाचे फोटो लिक झाले होते. अनुष्का आणि विराट यांनी पत्रकारांपासून वाचण्यासाठी आणि गर्दी पासून वाचण्यासाठी त्यांचे हनिमूनचे लोकेशन गुप्त ठेवले होते. अनुष्काने ह्या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता की तिला कोणी ओळखू नये म्हणून तिने हनिमून डेस्टिनेशन साठी फिनलँड हे ठिकाण निवडलं होते.
वरून धवन आणि नताशा दलाल
वरूण धवन आणि नताशा दलाल यांनी ह्याच वर्षी २४ जानेवारीला अलिबाग येथे लग्न केले. कोरोना काळ असल्याने आणि लोकांच्या गर्दीपासून वाचण्यासाठी वरूण आणि नताशा यांच्या लग्न मध्ये देखील पाहुण्यांसाठी अटी होत्या. यांच्या लग्न मध्ये पाहुण्यांना फोटो काढण्यास मनाई होती, आणि या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना कोरोना टेस्ट करणे देखील आवश्यक केले होते.
प्रियंका चोपडा आणि निक जोनस
प्रियांका चोपडा आणि निक जोनस यांनी त्यांचे लग्न जोधपुर मध्ये एकदम शानदार पद्धतीने केले. त्यांच्या लग्नामध्ये प्रियांकाचे नातेवाईक आणि निकचे कुटुंब सहभागी झाले होते. या दोघांचे लग्न चार दिवस चालले आणि या लग्नामध्ये २०० लोकांना आमंत्रण दिले होते. या लग्नामध्ये देखील पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी होती. याशिवाय पाहुण्यांना कार्ड देण्यात आले होते ते त्यांनी लग्नाचे विधी पूर्ण होईपर्यंत घालून ठेवायचं होतं. एवढी काळजी घेतल्यामुळेच त्यांच्या लग्नाचा एकही फोटो लिक झाला नव्हता.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग
दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न २० नोव्हेंबर २०१८ रोजी इटली मधील लेक कोमो या ठिकाणी संपन्न झाले. दिपवीर यांच्या लग्नामध्ये त्यांच्या घरातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होते. मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आणि रणवीरच्या लग्नामध्ये केवळ ३० लोकं सहभागी होते. बॉलीवूडमधील शानदार लग्नाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होते. या कपल्सने आपल्या लग्नामध्ये काही बंधने लावली होती. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना सांगितले होते की ते लग्न होईपर्यंत फोन वापरता येणार नाहीत.
बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रेटींच्या आयुष्यात काय चालू आहे हे फॅन्स आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायची अत्यंत उत्सुकता असते. मात्र कलाकरांना त्यांच्या जीवनामधील असे काही खास क्षण हे खासगीच ठेवायचे असतात. म्हणूनच कलाकार त्यांच्या लग्नांमध्ये अशा प्रकारच्या अटी ते लागू करतात.
‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…