Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या किंग खानच्या ‘त्या’ एका चुकीमुळे भडकले होते संपूर्ण कुटुंब, पोटच्या पोरांनीही…

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या किंग खानच्या ‘त्या’ एका चुकीमुळे भडकले होते संपूर्ण कुटुंब, पोटच्या पोरांनीही…

शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला ‘किंग खान’ म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहतात. मात्र, हेही खरे आहे की, शाहरुख खान एक कौटुंबिक व्यक्ती आहे. तो त्याची पत्नी गौरी खान आणि तिन्ही मुलांवर प्रचंड प्रेम करतो. शाहरुख आपल्या आपल्या कुटुंबासोबत जमेल तेवढा वेळ घालण्याची एकही संधी सोडत नाही. मुलांसह सुट्टीवर जाण्यापासून ते मुलगी सुहानाला विमानतळावर सोडेपर्यंत तो अनेकदा माध्यमांच्या कॅमेऱ्याद कैद झाला आहे.

शाहरुख खानच्या कुटुंबातील व्यक्तीही त्याच्यावर खूप प्रेम करतात, पण तुम्हाला माहिती आहे का? की अनेकदा शाहरुखला त्याच्या कुटुंबाकडून त्याला ओरडा खावा लागला आहे. होय, आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाहरुख खानने चूक केली, तर त्याची पत्नी गौरी तसेच मुले त्याला ओरडतात आणि हे स्वतः अभिनेत्याने हे एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. आयपीएलवरून झालेले वाद देखील त्याने सांगितले. (when shahrukh khan family got angry over a mistake children also took classes)

खरं तर, २०१२ मध्ये शाहरुख खानचा मालकी हक्काचा संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू होता. दरम्यान अभिनेता काही मुलांसह वानखेडे स्टेडियमवर दाखल झाला होता. यावेळी शाहरुख खानने क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे त्याला बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आणि शाहरुख खानच्या चुकीबद्दल कुटुंबीयांनी त्याला बरेच काही ऐकवले होते.

शाहरुख खानला एका मुलाखतीत या घटनेबाबत विचारण्यात आले. यावर त्याने सांगितले होते की, “होय, तेव्हा मला खूप राग आला होता. खूप राग आला होता. याची मलाही लाज वाटते. मग मला वाटले की, आपल्या मुलांशी गैरवर्तन होत आहे. त्या दरम्यान मी पण खूप प्रेमाने म्हणालो की आम्हाला मुलं आहेत आणि आम्ही त्यांना नेत आहोत. तिथे एक व्यक्ती काहीतरी बोलला होता आणि मला त्याच्याच बोलण्याचा राग आला होता.”

यापुढे शाहरुख खान म्हणाला होता, “हे खरे आहे की, मी हे करू नये. दुसर्‍या दिवशी घरी घडलेल्या घटनेबद्दल मी माफी मागितली. जेव्हा मी स्टेडिअममधून घरी पोहोचलो, तेव्हा माझी पत्नीच नाही तर माझ्या मुलांनीही मला शिवीगाळ केली. मग मी माझ्या मुलाला म्हणालो, तिथे काय झाले ते तू पाहिलेस, पण त्याने मला उत्तर दिले आणि म्हटले की पापा, हे खूप झाले. तुम्ही हे अजिबात करायला नको होते.”

“मी सुहानालाही सांगितले की, तो मला शिवीगाळ करत होता, पण सुहानाने मला म्हणाली की, हो ठीक आहे, पण तुम्ही खूप रागावला होता. तुम्ही खूप मोठे अभिनेता आहात. तुम्ही शांत राहायला हवं होतं.”

शाहरुख नुकताच मोठ्या धक्क्यातून सावरला आहे. कारण, त्याचा मुलगा आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली होती. त्यानंतर आर्यनला न्यायालयाने आर्थर रोड तुरुंगात पाठवले होते. २० पेक्षा अधिक दिवसांनंतर तो बाहेर आल्यानंतर शाहरुख आणि खान कुटुंबाला दिलासा मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा