टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात ग्लॅमरस असलेली आणि लोकप्रिय, प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सतत या ना त्या कारणामुळे लाइमलाईट्मधे येत असते. ती तिच्या बोल्ड लुक्समुळे आणि बिनधास्त अंदाजामुळे फॅन्समध्ये आणि मीडियामध्ये सतत चर्चेत येत असते. सोशल मीडियावर देखील निया प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी तिचे बोल्ड फोटोज शेअर करताना दिसते. कधी कधी निया तिच्या बोल्ड फोटोंमुळे आणि बिनधास्त अंदाजमुळे ट्रोल देखील होते. निया अनेकदा तिच्या व्यक्तव्यांमुळे देखील प्रकाशझोतात येते. आता नियाने तिच्या शरीरावर वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने हे वक्तव्य केले आहे.
नियाने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, तिची पोट फुगण्याची प्रवृत्ती आहे. हे शांत राहण्यासाठी खूप वेळ लागतो की, तिचे पोट कायम सपाट नाही राहणार. ती तिच्या शरीरसंबंधित गोष्टींसाठी खूपच चिंताग्रस्त असते. तिला तिचे शरीर आवडत नाही असे नाही, मात्र ती तिच्या शरीराच्या अनेक मुद्द्यांची अतिविचार करते आणि त्या मुद्यांना सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.
तिने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितले, “मी जेवण करणेच बंद केले. जेव्हा मी जेवण करणे बंद करते तेव्हा काही म्हणजे काहीच खात नाही. मी उपाशी झोपते. दिवसभर उपाशी राहते. मी उपाशीच जिममध्ये जाते. मला भूख पण नव्हती लागत कारण मी माझी भूकच गमवून बसली होती. मी फक्त त्या गाण्यात माझे पोट सपाट दिसण्यासाठी प्रयत्न करायची.”
पुढे ती म्हणाली, “मी एक खूपच साधारण दिसणारी मुलगी आहे आणि मी हे स्वीकार केले आहे. असे बोलण्यामध्ये मला कोणताही वाईटपणा येत नाही. दुस्वास करणे हा खूपच मोठा आणि जड शब्द आहे. माझ्या शरीरात असे काही नाही जे मी बदलू इच्छिते. मला एक गोष्ट समजण्यास खूप वेळ लागला की, ३६५ दिवस माझे पोट सपाट राहणार नाही.”
नियाने तिच्या करिअरमध्ये ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘नागिन’, ‘जमाई राजा’ आदी अनेक सुपरहिट शो दिले आहे. नियाने टेलिव्हिजनसोबत ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील दिसत आहे. लवकरच नियाचे ‘फूंक ले’ हे गाणे प्रदर्शित होणार असून ती सध्या या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
हेही वाचा-










