बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) हे चित्रपट जगतातील पॉवर कपल आहेत. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. पण गेल्या काही दिवसांपासून दोघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. प्रियांकाने अचानक चोप्रा आणि जोनास ही दोन्ही आडनावे सोशल मीडियावरून काढून टाकल्यापासून हे सुरू आहे. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचा दावा केला जात आहे. पण प्रियांका आणि निक यांनी स्वत: हे वृत्त खोटे असल्याचे सिद्ध केले आणि त्यांनी संपूर्ण जगाला त्यांच्या खऱ्या प्रेमाविषयी सांगितले.
निक जोनासचा व्हिडिओ होतोय व्हायरल
त्याचवेळी, आता निकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो सांगत आहे की, तो एक चांगला नवरा बनू शकला नाही. या व्हिडिओमध्ये निक त्याच्या मनातील गोष्टी बोलताना दिसत आहे. तो व्हिडिओमध्ये “मला भीती वाटते की, मी चांगला पती, भाऊ आणि मुलगा नाही,” असे म्हणताना दिसत आहे. (nick jonas reveals his biggest fear about priyanaka chopra)
कुटुंबाबद्दल म्हणाला…
निकच्या ‘जोनास ब्रदर्स’वर बनलेली सीरिज आली असून, या सीरिजचा पहिला भागही प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडिओ निकच्या फॅन पेजने शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याची पत्नी प्रियांका आणि कुटुंबाबद्दल बोलत आहे. व्हिडिओमध्ये, तो त्याचे कुटुंब त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असल्याचे सांगतो. तो म्हणतो की, “माझ्यासाठी माझे कुटुंब सर्वात महत्त्वाचे आहे. मी त्यांच्याशी कसे वागतो हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मी त्यांच्याबद्दल माझे प्रेम आणि आदर कसा दाखवू? आपल्या सर्वांचे प्रेम करण्याचे आणि स्वीकारण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.”
व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
निक जोनासच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येकजण त्याला कमी लेखू नको याबद्दल बोलत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “स्वतःला कमी लेखू नको निक तू सर्वात प्रेमळ, काळजी घेणारा आणि सपोर्टिव्ह पतींपैकी एक आहेस.” दुसर्या युजरने लिहिले, “त्याच्या वागण्यावरून दिसून येते की, तो खूप समर्पित पती आहे.”
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या हॉलिवूड चित्रपट ‘द मॅट्रिक्स रिसर्क्शन्स’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला, ज्यामध्ये प्रियांका चोप्राचा लूक खूप पसंत केला गेला. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सिटाडेल’ हा प्रियांका चोप्राच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी एक आहे.
हेही वाचा-