बिग बॉसच्या घराचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. पहिलाच आठवड्यापासून बिग बॉस चर्चेत दिसून येतोय. घराच्या सुरुवातीपासूनच दोन टीम झालेल्या दिसून आल्या. मात्र सध्या घरात एक वेगळाच त्रिकोण झालेला दिसत आहे. हा त्रिकोण प्रेमाचा नसून , मैत्रीचा आहे. निक्की, अरबाज व अभिजीत यांच्यात मैत्रिणीचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. निक्की व अरबाज टीम एचे सदस्य आहेत. अभिजीत टीम बी चा सदस्य आहे. विरुद्ध टीम मध्ये असून सुद्धा निक्की व अभिजीत यांची चांगली मैत्री फुलताना दिसत आहे. अभिजीतच्या मनात निक्की बद्दल सॉफ्ट कॉर्नर दिसून येत आहे. तसेच निक्की सुद्धा अभिजीत बद्दल शांततेत बोलताना दिसून येते. यांच्या या मैत्रीचा परिणाम टीम ए व टीम बी दोघांवरही होताना दिसून येत आहे.
बिग बॉस कडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसून येते की, अरबाज अंकिताला म्हणतोय की, “अभिजीत समोर असेल तर तू बोलू नको. मी आता बैल झालो मी कोणालाही जाऊन भिडेन.”
अभिजीत व निक्कीच्या या झालेल्या मैत्रीमुळे दोन्ही ग्रुपवर काय परिणाम पडतो हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे. दरम्यान या आठवड्यात वैभव चव्हाण, अभिजीत सावंत, आर्या जाधव, इरिना नॉमिनेट झाले आहेत. त्यांच्यापैकी कोण घरात आहे हे पाहणे नक्कीच उत्सुकतेच असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
शाहरुख खान लोकांना त्याच्याबद्दल चांगले बोलण्यासाठी पैसे देतो का? तापसीला सांगितले सत्य
अंकिताने नवऱ्यासमोर ठेवली होती ही अट, मान्य असेल तरच करेन लग्न !