Sunday, September 8, 2024
Home मराठी बिग बॉसच्या घरात निक्कीची आरेरावी पुन्हा सुरू; पॅडीसोबत केलं जोरदार भांडण

बिग बॉसच्या घरात निक्कीची आरेरावी पुन्हा सुरू; पॅडीसोबत केलं जोरदार भांडण

नुकताच बिग बॉसमध्ये (Bigg Boss) भाऊचा धक्का भाग पार पडला. या आठवड्यात घराबाहेर कोणीही पडलेले नाही. पण तरीसुद्धा नॉमिनेट झालेला सदस्यांवर अजूनही टांगती तलवार आहे. पण, ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेश दादाने सगळ्याच स्पर्धकांना आपला खेळ अजून चांगला करण्याचा इशारा दिला.

बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर रविवारच्या भागात खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने आपल्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या टीमसह हजेरी लावली होती. आता नवा आठवडा सुरू झाला नव्या जोमाने कल्ला होणार आहे. नुकताच ,कलर्स मराठीच्या अकाउंटवरून प्रोमो शेअर करण्यात आला आहे. पंढरीनाथ कांबळे यांनी तिच्या वस्तूंना हात लावल्यामुळे ती चिडल्याचे दिसत आहे. तसेच , तिने कॅप्टन अंकिताशी सुद्धा धक्काबुक्की केल्याचे दिसले.

प्रोमो मध्ये पाहायला मिळाले की निक्की पंढरीनाथ कांबळे यांना ओरडून विचारते आहे की, “माझ्या वस्तूंना का हात लावला.”? त्यावर पंढरीनाथ म्हणाले की, “मी माझी ड्युटी केली”. त्यावर त्यांना प्रतिउत्तर देत नक्की म्हणते, ” ड्युटी करायची काम करायची समजलं ना”? त्यावर पंढरीनाथ तिला उत्तर देतात, “तू तुझी ड्युटी पार पाडत नव्हतीस म्हणून मला हात लावावा लागला.”

त्यानंतर तिने घरातील सर्व सदस्यांचे कपडे अस्ताव्यस्त केले. कॅप्टन आलेल्या अंकिताला सुद्धा निक्कीने बेडवर ढकलून दिले. हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, “निक्कीच्या कल्ल्याने झाली आठवड्याची सुरुवात, कपड्यांची फेकाफेकी आणि कॅप्टन बरोबर धक्काबुक्की” असे कॅप्शन दिले आहे. आता झालेल्या प्रकरणावरून, रितेश दादा काही बोलणार का, हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे.

बिग बॉस मराठी सदस्य
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेदार, अभिजित सावंत, निकी तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, घनश्याम, आर्या जाधव, धनंजय पवार, वैभव चव्हाण, इरिना रुदाकोवा, अरबाज पटेल, सुरज चव्हाण हे सदस्य आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –  

अभिनेत्री अमृता खानविलकर एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे “वर्ल्ड ऑफ स्त्री”
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणार ‘धर्मा- दि एआय स्टोरी, पुष्कर जोग असणार या भूमिकेत

author avatar
Shruti Pathak

हे देखील वाचा