Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन बिग बॉसमध्ये जायला अंकिताने दिला होता नकार; अभिनेत्रीचा जुना व्हीडीओ चर्चेत…

बिग बॉसमध्ये जायला अंकिताने दिला होता नकार; अभिनेत्रीचा जुना व्हीडीओ चर्चेत…

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सुरु झाल्यापासूनच चांगली चर्चा आहे. या सीझनमध्ये अनेक सोशल मीडिया स्टार सहभागी आहेत. काही चेहरे ओळखीचे आहेत तर काही अनोळखी. जास्त चर्चा आहे ती म्हणजे अंकिता प्रभू वालावलकरची. अंकिता सध्या बिग बॉसमध्ये चांगलं खेळतेय. इतकंच नाही तर ती घरातली पहिली कॅप्टनही झाली आहे. पण अकिताने एकदा जुन्या मुलाखतीत बिग बॉसमध्ये जायला नकार दिला होता. 

अंकिता प्रभू वालावलकरने एका न्यूज चॅनलला एक वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती. त्यात तिने बिग बॉसच्या घरात जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं होतं. इतकच नव्हे तर त्यामागचं कारणही सांगितलं होतं. अंकिता म्हणाली होती, “मी बिग बॉसमध्ये नाही जाणार कारण मी भांडत बसेन तिथे जाऊन मला पटत नाहीत कोणाच्या गोष्टी, त्यामुळे मी नाही जाणार तिथे. 

अंकिताने जरी कधीकाळी बिग बॉस मराठीमध्ये जायला नकार दिला असला तरी सध्या मात्र ती बिग बॉस मराठी गाजवताना दिसतेय. तिचा आजवरचा प्रवास तर चांगला राहिलाच आहे. बघुयात इथून पुढे ती कशी खेळते.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

पॉलिटिक्स आहे रे सगळं! विनेश फोगटच्या बातमीवर अभिनेता समीर परांजपेची पोस्ट चर्चेत…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा