Monday, September 16, 2024
Home बॉलीवूड ‘हाऊसफुल 5’मध्ये लागणार अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या कॉमेडीचा तडका?, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘हाऊसफुल 5’मध्ये लागणार अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या कॉमेडीचा तडका?, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘हाऊसफुल’ बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि चंकी पांडेसोबतच अनिल कपूर आणि नाना पाटेकर हे देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार ‘हाऊसफुल 5’ लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे, ज्याचे शूटिंग शेड्यूल देखील समोर आले आहे.

‘हाऊसफुल 5’ चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार असून, त्याचे शूटिंग लवकरच ब्रिटनमध्ये सुरू होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 6 जून 2025 निश्चित केली आहे. अनिल आणि नाना पाटेकर ‘हाऊसफुल 5’ मध्ये सहभागी झाल्याची बातमी आल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटातील अप्रतिम स्टारकास्ट एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांची जोडी ‘वेलकम’ चित्रपटात दिसली होती.

तर अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासोबत चंकी पांडे त्याच्या शेवटच्या पास्ता भूमिकेतून पुनरागमन करत आहे. इतर पात्रांसाठी कास्टिंग सुरू आहे. या चित्रपटातील एका पात्रासाठी निर्मात्यांनी बॉबी देओललाही अप्रोच केल्याची अफवा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘हाऊसफुल’चा समावेश बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी फिल्म फ्रँचायझीमध्ये होतो. ‘दोस्ताना’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे तरुण मनसुखानी यांनी दावा केला आहे की, ‘हाऊसफुल 5’ एक उत्तम कथा आणि अप्रतिम व्हिज्युअल्ससह प्रेक्षकांसमोर येईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

करिष्मा कपूरने केला करिअरमधील चढ-उतारांचा खुलासा; म्हणाली, ‘आमच्या वेळी पीआर टीम…’
मुंबई मेट्रोमध्ये डान्स केल्याने नोरा फतेही ट्रोल: लोक म्हणाले, ‘स्वस्त नौटंकी…’

हे देखील वाचा