हिंंदी सिनेेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत लेखक आणि अभिनेता अशा दोन्हीही क्षेत्रात काम केले आहे. यांपैकीच एक नाव म्हणजे निरज वोरा. निरज वोरा यांनी आपल्या अभिनयक्षेत्राच्या कारकिर्दित मोजकेच चित्रपट केले मात्र यामधून त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
निरज वोरा (niraj vora) हे सिनेसृष्टीतील एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी कथा लेखक आणि शेवटी दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले. त्यांचा जन्म एका गायकाच्या घरी झाल्याने त्याच वातावरणात ते वाढले, मोठे झाले. एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केले. कथा लिहिता लिहिता त्यांनी अभिनयालाही सुरुवात केली. यामधूनच त्यांनी आपल्या चाहत्यांना या कलेचं दर्शन घडवून दिलं होतं. त्यांनी आमिर खानच्या ‘रंगीला’ सह अनेक चित्रपटात काम केले आहे. सोबतच त्यांनी अनेक चित्रपटाचं लेखनसुद्धा केले, जे सुपरहिट ठरले आहेत.
निरज वाेरा यांचा जन्म २२ जानेवारी १९६३ मध्ये एका गुजराती कूटुंबात झाला होता. मात्र त्यांच बालपण सांताक्रूजमध्ये गेलं.. त्यांचे वडिल पंडित विनायक राय नानालाल वोरा हे एक शास्त्रीय संगितकार होते. त्यामुळेच वयाच्या ६व्या वर्षापासून निरज यांनी पडद्यावर काम करायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनीही त्यांना यासाठी पाठिंबा दिला. निरज यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी त्यांच्या वडिलांकडून संगिताचे धडे घेत होते. सोबतच निरजही त्यांना चित्रपटातील गाण्यांवर हार्मोनियम कसे वाजवतात याचे धडे देत होते. यामुळे ते त्यांच्या शाळेत खूपच प्रसिद्ध होते.
घरातूनच अभिनयाचे धडे मिळाल्याने निरज यांनी कॉलेजपासूनच आपल्या अभिनयच्या करिअरला सुरुवात केली. १८८४ मध्ये आलेल्या केतन मेहता यांच्या ‘होली’ चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले होते. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांना आमिर खान, ओम पूरी, नसरुद्धीन शहांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच लेखन हि निरज वोरा यांनीच केल होत. मुख्य अभिनेता हजर नसल्याने ही भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली आणि या संधीच त्यांनी सोन केल.या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेच सर्वत्र कौतुक केल गेल. सोबतच त्यांना अनिल कपूर यांच्या विरासतमध्येही संधी मिळाली.
चित्रपटाच लेखन आणि अभिनय करता करता त्यांनी हळूहळू दिग्दर्शनामध्ये जम बसवण्यास सुरुवात केली. अक्षय कुमारच्या ‘खिलाडी ४२०’ चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. फिरोज नाडियावालाचे ‘आवारा पागल दिवाना’ आणि ‘दीवाने हुए पागल’ या चित्रपटाच्या लेखनाबरोबर ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात त्यांना दिग्दर्शक सतिश कौशिक यांच्या जागी दिग्दर्शनाची संधी मिळाली.
निरज वोरा यांनी अनेक चित्रपट लिहीले, पाच चित्रपटांच निर्देशनही केल मात्र त्यांना खरी ओळख ही अभिनेता म्हणूनच मिळाली. आपल्या हजरजबाबीपणासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. कितीही मोठी भूमिका असली, तरी आपल्या खास शैेलीने ते प्रेक्षकांची मने जिंकायचे. त्यांनी ‘विरासत’, ‘सत्या’,’मन’, ‘बादशाह’, ‘हॅलो ब्रदर’, ‘धडकन’ आणि ‘बोल बच्चन’सारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम केले.आपल्या अभिनयाच्या जादूने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलाकाराचा एका प्रदिर्घ आजाराने २०१७ मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी मृत्यू झाला.
हेही वाचा :