Tuesday, March 24, 2026
Home बॉलीवूड काय फॅन आहे राव! लाडक्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी औरंगाबादवरून गाठली मुंबई, नोरा फतेहीसाठी हातावर काढला टॅटू

काय फॅन आहे राव! लाडक्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी औरंगाबादवरून गाठली मुंबई, नोरा फतेहीसाठी हातावर काढला टॅटू

बॉलिवूडची प्रसिद्ध ‘दिलबर गर्ल’ अर्थात नोरा फतेही या दिवसांत सोशल मीडिया क्वीन बनली आहे. कारण इथे ती सतत काही न काही कारणास्तव चर्चेत असते. अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतो. अभिनेत्रीचे चाहते तिच्या स्टाईल आणि अदांवर फिदा आहेत. तसेच तिच्या डान्सचा चाहतावर्गही भलामोठा आहे. परदेशातून भारतात आलेली नोरा, आज तिच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका बनली आहे. नुकत्याच एका कट्टर चाहत्याने स्वत: अभिनेत्रीला भेटण्यासाठी मुंबई गाठली. नोराचा हा चाहता तिला मुंबई विमानतळावर भेटला. त्यानंतर अभिनेत्रीचा विश्वास बसला नाही की, कोणीतरी तिला या प्रकारे प्रेम करत आहे.

होय, नोराचा हा चाहता तिला भेटण्यासाठी गुरुवारी (२९ एप्रिल) मुंबई विमानतळावर पोहोचला. अभिनेत्री बाहेर येताच, उपस्थित असलेल्या मीडियाने तिची भेट या चाहत्याशी करून दिली. यानंतर मीडियाने नोरासोबत त्या व्यक्तीचे फोटो काढले. नोराने आपल्या चाहत्यासोबत, त्या ठिकाणी केकही कापला, नोराचा हा अंदाज सर्वांनाच खूप भावला. दरम्यान, अभिनेत्रीने आपला मास्क काढण्यास मीडियाला नकार दिला. त्यानंतर मीडियानेही अभिनेत्रीला आग्रह केला नाही. हा व्हिडिओ पॅपराजी वरंदर चावला याने त्याच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे.

विशेष म्हणजे, भारतात काही ठिकाणी लॉकडाऊन असूनही नोराचा हा चाहता केवळ तिला भेटण्यासाठी औरंगाबादहून आला होता. तसेच तो बर्‍याच दिवसांपासून विमानतळावर अभिनेत्रीची वाट पाहत होता. एवढेच नव्हे, तर या चाहत्याने त्याच्या शरीरावर नोरासाठी एक टॅटूही काढलेला पाहायला मिळाला. जेव्हा मीडियाने अभिनेत्रीला हे सांगितले, तेव्हा ती खूप आनंदी झाली.

नोरा गुरुवारी (२९ एप्रिल) बंगळुरूहून परतली आहे. त्या ठिकाणी ती ‘डान्स दीवाने ३’ साठी जज म्हणून पोहोचली होती. अनेक दिवसांपासून अभिनेत्री कामाच्या संदर्भात खूप प्रवास करत आहे. तसेच, विमानतळावर नोराचा प्रेमळ अंदाज सर्वांनाच आवडला. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: पाहा दबंग खान सलमान कसा शिकला ‘सिटी मार’ गाण्याच्या अवघड डान्स स्टेप्स, प्रभूदेवाने देखील केले कौतुक

-नुसता राडा…राडा! अल्लू अर्जुनच्या ‘बुट्टा बोम्मा’ गाण्याने मोडले इतर गाण्यांचे रेकॉर्ड; मिळाले तब्बल ५९ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-माणसातील देव म्हणतात तो हाच! विमानतळावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सोनू सूदने दिले मदत करण्याचे वचन

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

हे देखील वाचा