×

नीना गुप्ता यांनी करिअरच्या सुरुवातीला केला होता कास्टिंग काऊचा सामना; ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितला त्या रात्रीचा किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या दिवसात सर्वत्र चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी ‘सच कहूं तो’ मुळे सध्या खूप चर्चेत आहे. त्यांनी त्यांच्या या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील नवनवीन गोष्टी समजत आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचबद्दल देखील सांगितले. याबद्दल त्यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची नावे घेतली आहेत.

नीना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी बॉलिवूडमधील अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गोष्टींचा सामना केला आहे. याचा अनुभव त्यांनी या पुस्तकात शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील त्या घटनेचा खुलासा केला आहे, जेव्हा एका साऊथ इंडियन निर्मात्याने त्यांना हॉटेलच्या रूममध्ये भेटायला बोलावले होते. त्यांनी ज्या हॉटेलमध्ये बोलावले होते, ते हॉटेल थिएटरच्या जवळच होते. त्यामुळे त्यांचा शो संपल्यावर त्या निर्मात्याला भेटायला गेल्या होत्या. त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्या निर्मात्यांनी त्यांना आतमध्ये बोलावले. नीना यांनी सांगितले की, त्या अजिबात तयार नव्हत्या. त्यांना असे वाटत होते की, त्यांना खालीच भेटायला बोलवावे. पण त्यांना वाईट वाटेल, म्हणून नीना शांत राहिल्या. ( Neena Gupta told about casting couch in the beginning of her career)

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना यांनी पुढे सांगितले की, त्यांनी इकडच्या तिकडच्या अनेक गोष्टी बोलताना त्यांच्या रोलबाबत विचारले. तेव्हा सांगितले की, त्यांना अभिनेत्रीच्या मैत्रिणीची भुमिका साकारायची आहे. तेव्हा त्यांना त्यात काही इंटरेस्ट वाटला नाही आणि त्यांनी ते पात्र करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, त्यांचे मित्र वाट पाहत आहेत. तेव्हा ते निर्माते त्यांना म्हणाले की, “तू इथे रात्र नाही घालवणार का ?” हे ऐकल्यावर मात्र त्या खूपच घाबरल्या आणि तेथून निघून गेल्या.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता यांनी नंतर त्यांच्या या वागणुकीला मूर्ख असे म्हंटले. त्या म्हणाल्या की, “ही माझी चूक होती मला तिथे संध्याकाळी नव्हते जायला पाहिजे.” त्यांनी सांगितले की, “तुम्हाला कोणत्याही पात्रासाठी कोणासोबत झोपायची गरज नाहीये.”

नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ऐकून सध्या त्यांचे चाहते हैराण झाले आहे. त्यांनी आयुष्यात या सगळ्या गोष्टींचा सामना केलाय यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित

Latest Post