सोनू कक्करही झाली ‘इंडियन आयडल १२’ मधील अरुणिताच्या आवाजाची दिवानी; दिली तिला ‘ही’ खास भेट


मागील काही काळापासून रियॅलिटी शोजला खूप महत्व प्राप्त झाले आहे. अशा शोमधून मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रतिभेला मिळणारा सन्मान, करियरला मिळणारा पाठिंबा आणि मुख्य म्हणजे ग्लॅमर. लोकांना रियॅलिटी शो म्हटले की ह्या सर्व गोष्टी आकर्षित करत असतात. सध्याच्या घडीला टीव्ही इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय रियॅलिटी शो म्हणून ‘इंडियन आयडल’चे नाव घेतले जाते.

तसी पण ‘इंडियन आयडल’चा आता सुरु असलेला १२ वा सिझन विविध वादांमुळे खूप गाजत आहे. ‘इंडियन आयडल’च्या काही दिवसांपासून येणाऱ्या बातम्या या फक्त वादांशी संबंधित होत्या. मात्र आज ‘इंडियन आयडल’ची वेगळी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा शो आता हळूहळू अंतिम फेरीकडे वळत असताना, शो मधील स्पर्धक देखील एकापेक्षा एक असे जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. या शोच्या येणाऱ्या भागात लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी यांच्या जोडीतील आनंदजी पाहुणे म्हणून येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात सर्वच स्पर्धक त्यांच्या सुरेल आवाजाने सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (arunita kanjilal received a chunar from sonu kakkar)

या शोला तडका देण्याचे काम इंडियन आयडलचा सूत्रसंचालक असलेला आदित्य नारायण करत असतो. आपल्या अनोख्या अंदाजाने तो शोला चार चाँद लावतो. या भागाचे शूटिंग पूर्ण झाले असून, या भागात स्पर्धक अरुणिता कांजिलालने जबरदस्त सादरीकरण केले आहे. तिने ‘सलाम -ए -इश्क’ हे गाणे गात सर्वांनाच तिचे कौतुक करण्यास भाग पडले.

सध्या परीक्षक म्हणून काम पाहणारी सोनू कक्कर तर अरुणिताच्या गाण्याने आणि आवाजाने इतकी प्रभावित झाली की, तिने अरुणिताला माता की चुनर भेट दिली आहे. अरुणिता देखील सर्वांचे हे प्रेम आणि कौतुक पाहून भावुक झाली होती. यावेळी सोनू म्हणाली, ” इंडियन आयडलसारख्या मोठ्या आणि मानाच्या मंचावर असे प्रतिभावान टॅलेंट बघणे मी माझे सौभाग्य समजते. तुझे गाणे ऐकून मी खरंच खूप खुश आहे.”

अरुणिताने यावर प्रतिक्रिया देत म्हटले, “मी सर्वांची खूप आभारी आहे. मला या शो ने ते बनवले आहे जे मी आज आहे. मी परीक्षक आणि प्रेक्षकांचे सर्वांचे आभार व्यक्त करते. तुम्ही मला एवढे प्रेम दिले. माता की चुनर मिळाल्यामुळे मला विश्वास आहे की मी पुढेही माझा उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित


Leave A Reply

Your email address will not be published.