अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं नावं कमावले आहे. आपलं वेगळं असं स्थान निर्माण केले आहे. ती आपल्या जबरदस्त डान्स स्टाईलने बॉलिवूडमध्ये इतकी लोकप्रिय झाली आहे की, जर बेस्ट डान्सरबद्दल बोलायचे झाल्यास लोकांच्या तोंडात सर्वप्रथम नोराचं नाव येतं. नुकतेच नोराचे नवीन गाणे ‘छोड देंगे ‘हे रिलीझ झाले आहे. हे गाणे इंटरनेटवर आग लावत असून यामध्ये ती एकदम भन्नाट दिसत आहे.
या गाण्यात नोराचा डान्स तर खूपच अप्रतिम आहे. परंतु डान्स सोबतच तिच्या कमालीच्या एक्स्प्रेशनमुळे देखील ती खूप चर्चित आहे. या गाण्यासाठी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तिने हे गाणे लोकप्रिय बनवण्यासाठी आणि यश मिळवून देण्यासाठी खूप मेहनत घेऊन हे काम केले आहे. या गाण्याच्या मेकिंगचा पडद्यामागच्या एक व्हिडिओही प्रेक्षकांसमोर आला आहे. ज्यात नोरा एक एक डान्स स्टेप आणि एक्स्प्रेशन योग्य रीतीने शिकताना दिसत आहे. त्यासाठी तिने खूपच मेहनत घेतली आहे. तिच्या या व्हिडिओला एकाच आठवड्यात ६ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हे गाणे नोरासाठी यामुळे अवघड होत की, नोराने याआधी ही डान्स स्टाईल कधीच केली नव्हती. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. परंतु तिने खूप मेहनत घेऊन हे गाणे शूट केले. नोरा वेस्टर्न डान्स स्टाईलमध्ये तर खूपच तरबेज आहे. परंतु इंडियन फोक फ्युजन स्टाईल तिने पहिल्याच वेळेस केला आहे. या डान्स स्टाईलमधे एक्स्प्रेशनला खूप महत्त्व असतं. या गाण्यातील नजाकती, अदा शिकण्यासाठी नोराने खूपच कष्ट घेतले आहे.
‘परंपरा टंडन’ यांनी हे गाणे गायले आहे. सचेत आणि परंपरा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे, तर ‘योगेश दुबे’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. तसेच हे गाणे नोरा फतेही आणि एहन खान यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळताना दिसत आहे. एका आठवड्यातच या गाण्याने 1.8 मिलियन लाईक्सचा टप्पा पार केला आहे. या गाण्याच्या यशामागे नोराचा खूप मोठा हात आहे. कारण तिने तिच्या डान्स कोरिओग्राफरच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, म्हणूनच हे गाणे आज यशाची पायरी चढत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज