बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’

Valentine Day Special Know How Bollywood Superstar Amitabh Bachchan Married Jaya Bachchan


व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे. अनेक प्रेमवीर आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात अनेकांचं प्रेम सफल होतं, तर काहींचं अर्ध्यातच अपूर्ण राहतं. या प्रेमाच्या अनेक कहाण्या गाजल्या आहेत. त्यातली बॉलिवूडमधील एक लोकप्रिय प्रेमकहाणी म्हणजे ‘अमिताभ बच्चन’ आणि त्यांची पत्नी ‘जया बच्चन’ यांची कहाणी. अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगवर त्यांची प्रेमकहाणी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

यात बिग बी यांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा माझं आणि जयाचं लग्न ठरलं होतं, तेव्हा मी जेवीपीडी स्कीम सोसायटीच्या 7 नंबरच्या रस्त्यावर एका भाड्याच्या घरात राहतो होतो. ज्याचं नाव ‘मंगल’ असं होतं. आमचं लग्न अगदीच साध्या पद्धतीने झाले होते. आमच्या दोन कुटुंबांच्या उपस्थितीतच आमचं लग्न पार पडलं होतं. त्यांनतर आम्ही दोघे लंडनला गेलो. ही फक्त माझ्यासाठीचा पहिला प्रवास नव्हता, तर जया देखील पहिल्याच वेळेस लंडनला जात होती.”

“या आधी आमचा चित्रपट ‘जंजीर’ याला चांगलंच यश मिळालं होतं. यादरम्यान आमच्या सगळ्या मित्रांनी असं ठरवलं होतं की, जर हा चित्रपट चांगला प्रदर्शित झाला, तर आपण सगळे लंडनला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाऊ. आम्ही सगळे लंडनला जात आहोत हे सांगण्यासाठी आणि परवानगी घेण्यासाठी बाबूजींकडे गेलो, तेव्हा त्यांनी मला तिथेच प्रश्न विचारला की, ‘तुझ्यासोबत अजून कोण कोण जात आहेत?’ त्यावेळी मी त्यांना तिकडे कोण कोण जाणार आहोत त्या सगळ्यांची नावे सांगितली,” असे बिग बी म्हणाले.

पुढे बोलताना बिग बी म्हणाले की, “त्यानंतर परत त्यांनी सांगितले की, ‘तुझ्यासोबत जया देखील येणार आहे. तुम्ही दोघे तिकडे जाणार आहात.’ त्यावर मी त्यांना ‘हो’, असे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘जर तुम्हाला दोघांना सोबत लंडनला जायचे असेल, तर आधी लग्न करा आणि मग एकत्र लंडनला जा.’ त्यावर मी ‘ओके’ असं उत्तर दिलं. ”

“त्यानंतर लगेचच ब्राह्मणाला आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांना सांगितले गेले. लवकरात लवकर लग्ननाची सगळी तयारी केली गेली. त्याच रात्री आमची लंडनची फ्लाईट होती. फ्लाईटच्या आधी लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण करायच्या होत्या. मलबार हिलवर आमच्या लग्नाचं स्थळ फिक्स झालं होतं. तिथेच जयाची एक मैत्रीण देखील राहत होती. आणि तिथेच लग्नाच्या सगळ्या विधी होणार होत्या. मी पारंपारिक पोषाख घालून स्वतःच्या लग्नाला जाण्यासाठी तयार झालो. तिथे जाण्यासाठी मी ड्रायव्हिंग सिटवर बसलो. गाडी चालवायला तयार झालो,” असे त्यांनी पुढे म्हटले.

“हे बघून माझा ड्रायवर नागेशने मला ड्रायव्हिंग सिटवरून मागे ओढले आणि म्हणाला, ‘लग्नाच्या स्थळापर्यंत गाडी चालवत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे.’ अशा प्रकारे तेव्हा ती गाडीच आमच्यासाठी नवरदेवाचा घोडा म्हणून होती. जेव्हा आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा नेमका पाऊस पडायला लागला. त्यावेळी आमच्या शेजारचे आमच्या जवळ आले आणि म्हणाले, ‘पाऊस हा एक चांगला संकेत असतो, तुम्ही लवकर लग्न आटपून घ्या.’ त्यानंतर काही वेळातच आमचं लग्न झालं आणि आम्ही अधिकृत मिस्टर आणि मिसेस बच्चन झालो,” असे त्यांनी आपल्या लग्नाबद्दल बोलताना पुढे म्हटले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज
-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.