जाळ अन् धूर संगटच! नोरा फतेहीने ‘गर्मी’ गाण्यावर जोरदार ठुमके लावत केला लावणी डान्स, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

Nora fatehi's lavani dance on garmi song


प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये तिचे नाव कमावले आहे. यासोबतच तिचा चाहतावर्ग कोट्यवधीमध्येे आहे. आज प्रत्येकजण तिच्या अपडेटवर लक्ष ठेवत असतो. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. त्यामुळे तिचे अनेक चाहते सोशल मीडियावर तिच्या पोस्टची वाट पाहत असतात. तिचे डान्स व्हिडिओ देखील खूप वेगाने व्हायरल होत असतात. असाच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कलर्सने नोराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लावणी डान्स करताना दिसत आहे.

खरं तर नोरा तिच्या डान्स स्टेप्सचे जलवे नेहमीच दाखवत असते. अनेकजण तिचा डान्स बघून डान्स शिकण्याचा प्रयत्न करत असतात. तिच्या डान्समुळे तिच्या फॅन्सच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

नोराने ‘गर्मी’ या गाण्यावर लावणी केली आहे. तिचा हा वेगळा प्रयोग प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. तिचे चाहते तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिने केलेल्या या वेगळ्या प्रयोगाला भरभरून दाद देत आहेत. या वेगळ्या गाण्यावर लावणी केल्यामुळे तिचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

डान्सच्या बाबतीत नोराचा हात कोणीच धरू शकत नाही. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरिया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा सोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्या गायिकेच्या गाण्यांना यूट्यूबवर १ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेत, तिला कपडे धुताना पाहिलंय का? एकदा पाहाच

-बंगाल हिंसेवर ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतने रडत रडत दु: ख केले व्यक्त, सरकारकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

-एकदम कडक! युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने चाहत्यांना शिकवला ‘सपने में मिलती है’ गाण्यावर डान्स, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.