Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड हाय गर्मी!! लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम

हाय गर्मी!! लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम

बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नोरा फतेही हिचा समावेश होतो. नोरा ही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. अशातच तिचा अत्यंत एक बोल्ड आणि हॉट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा चालू आहे.

नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने बॉडी फिटेड लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. ऑफ शोल्डर आणि डिपनेक असलेला हा ड्रेस तिला खूपच खुलून दिसत आहे. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत आणि पेन्सिल हिल्स घातले आहेत. बॉडी फिटेड साईड कटच्या या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिने जमिनीवर पोझ दिल्या आहेत. लाल रंगाच्या लिपस्टिकमध्ये आणि मेकअपमध्ये ती अजूनच आकर्षक दिसत आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडिया खूप वेगाने व्हायरल झाले आहेत. तिचे अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देऊन तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (Nora fatehi’s red colour dress photos viral on social media)

नोरा ही एक अभिनेत्री तसेच एक डान्सर देखील आहे. डान्सच्या बाबतीत नोराचा हात कोणीच धरू शकत नाही. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर ३’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा सोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

हे देखील वाचा