संजीव कुमार (Sanjiv Kumar) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिने जगतातील एक काळ चांगलाच गाजवला होता. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांची आणि अभिनयाची आजही चर्चा होताना दिसत असते. दिलीप कुमार आपल्या अभिनयाइतकेच त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळेही विशेष गाजले. संजिव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. हे सर्वांनाच माहित आहे. पण संजीव कुमार आणि अभिनेत्री नुतन यांची प्रेमकथाच सिने जगतात सर्वाधिक गाजली होती. पाहूया त्यांच्या लवस्टोरीचे गाजलेले किस्से.
संजीव कुमार आणि नूतन यांनी 1968 मध्ये आलेल्या ‘देवी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. इथूनच संजीव कुमार आणि नूतन एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. याच चित्रपटामुळे दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. नूतन आधीच विवाहित होती आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिचा पती लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी माहिती घेत नव्हती. नूतन आणि रजनीश बहल यांचे १९५९ मध्ये लग्न झाले.
रजनीश यांना नूतन आणि संजीव कुमार यांच्यातील संबंधाचा सुगावा लागला होता. यानंतर नूतनने आपले लग्न वाचवण्यासाठी संजीव कुमार यांच्याशी दुरावा निर्माण केला. मात्र, नूतननंतर संजीव कुमार यांचे मन अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर आले. असे म्हटले जाते की संजीव कुमार यांनी हेमा मालिनींना दोनदा प्रपोज केले पण त्यांनी नकार दिला. यामुळे संजीव कुमार इतके दुखावले होते की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचेही संजीव कुमारवर प्रेम होते. अशा परिस्थितीत जेव्हा संजीवने लग्न केले नाही तेव्हा सुलक्षणा पंडितही अविवाहित राहिल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
अभिजित बिचुकलेने शरद पवारांकडे केली मोठी मागणी म्हणाला, ‘मी राष्ट्रपती होऊ शकतो पण…’
दिलीप कुमार मधुबाला अधुरी प्रेमकहाणी, दिलीप कुमार यांची ‘ही’ शेवटची इच्छाही राहिली होती अपूर्ण
‘मला अजिबात घाई नाही..’ लग्नाबद्दल अभिनेत्री कियारा अडवाणीने केला मोठा खुलासा










