अभिजित बिचुकलेने शरद पवारांकडे केली मोठी मागणी म्हणाला, ‘मी राष्ट्रपती होऊ शकतो पण…’

‘बिग बॉस’ (bigg boss) हा टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा शो आहे या शोमधून अनेकांना त्यांची ओळख मिळाली आहे. यातीलच मराठी बिग बॉसमधून अभिजित बिचुकले (abhijeet bichukale) खूपच चर्चेत आला. मराठीतील त्याची लोकप्रियता पाहता त्याला हिंदी बिग बॉसमध्ये देखील बोलवण्यात आले. परंतु त्याने तिथे देखील राडा करण्यास कमतरता दिली नाही. दर दिवशी तो काही ना काही अशा गोष्टी करायच्या, ज्यामुळे तो चर्चेत राहील. बिग बॉसमध्ये असताना त्याने राष्ट्रपती बनण्याची त्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली आहे.

नुकतेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचा हा मुद्दा मांडला आहे. अभिजीत बिचुकले यावेळी म्हणाला की, “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोप्प होईल. पवारांचा आमदार ऐकतात. त्यामुळे आमदारांच्या सह्या मिळतील आणि माझा राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा होईल.” अशाप्रकारे त्याने वक्तव्य केले. त्यानंतर आता तो जोरदार चर्चेत आला आहे. याआधी देखील अनेकवेळा तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेचा विषय बनला होता.

बिग बॉस १५ मधून बाहेर आल्यावर त्याने सलमान खानवरल(salman khan) देखील अनेक आरोप प्रत्यारोप केले होते. परंतु सलमान खानने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याने घरात असताना देखील अनेक स्पर्धकांशी भांडण केली होती. याआधी देखील अनेक निवडणूक लढल्या आहेत. त्याने उदयनराजे भोसले यांच्याविरोधात देखील निवडणूक लढली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Post