हरियाणाच्या ‘या’ पाच पोरी सर्वांनाच पडल्यात भलत्याच भारी, मुंबईत मेहनतीच्या जोरावर कमावले मोठे नाव


केवळ खेळात नव्हे तर बॉलिवूडमध्ये सुद्धा हरियाणाच्या अशा काही अभिनेत्री ज्यांनी आपले नाव उंचावले होते. हरियाणाची मानुषी छिल्लर ही जागतिक विश्वसुंदरी बनल्यानंतर हरियाणा राज्य पुन्हा एकदा चर्चेत राहिले आहे. बी टाऊनमध्ये काम करणाऱ्या हरियाणाच्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. आपण आज अशाच अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या राज्याचे नाव मोठे करण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.

मल्लिका शेरावत
ऑक्टोबर २४, १९७६ रोजी हरियाणामध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रिमा लांबा आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिने स्वतःचे नाव बदलून मल्लिका असे ठेवले. मल्लिका सन २०१८ मध्ये ‘ख्वाईश द स्टोरी’ या वेबसिरीज मध्ये झळकली होती. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती सन २००४ साली आलेल्या मर्डर या चित्रपटाने. आपल्या बोल्ड अंदाजाने ती चाहत्यांना नेहमीच प्रोत्साहित करीत असते. सन २०१५ मध्ये आलेला ‘डर्टी पॉलिटिक्स’ हा तिचा शेवटचा बॉलीवूड चित्रपट आहे.

जुही चावला
जुही चावला हिचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ ला हरियाणा मधील अंबाला येथे झाले होता. बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तीची गणना होते. सन १९८४ची “मिस इंडिया’ ची स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले होते. सन १९८६ च्या ‘सुलतान’ ह्या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अमीर खान सोबत तिचा ‘कयामत से कयामत’ हा चित्रपट यशस्वी झाला होता. हिंदीखेरीज तिने तामिळ, तेलुगू इत्यादी चित्रपटांत देखील काम केले आहे.

परिणीती चोप्रा
हरियाणा मधील अंबाला जिल्हयात परिणीती चोप्रा हीचा जन्म झाला होता. इंग्लंडच्या मॅचेस्टर विद्यापीठातून व्यापार, अर्थ आणि वाणिज्य क्षेत्रात तिने पदवी घेतली आहे. सन २०११ सालच्या ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पादर्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ती इशकजादे, शुद्ध देसी रोमांस, हसी तो फसी, किल दिल, डीशुम या चित्रपटात देखील दिसली होती. लवकरच ती सायना नेहवालवर आधारित बायोपिकमधून दिसणार आहे.

निकुंज मलिक
हरियाणाच्या गुरुग्रामनध्ये जन्मलेल्या निकुंजने आपल्या फिल्मी करियरची सुरवात छोट्या पडद्यावरून केली होती. तिने ‘रिव्हॉल्व्हर राणी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचप्रमाणे ती ‘शौकीन’ या चित्रपटात देखील दिसली होती. ती अनिल कपूर यांच्या ‘२४’शो मध्ये सिमरनच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती ‘सिंहासन बत्तीसी’ आणि ‘अदालत’ यासारख्या टीव्ही मालिकेत सुद्धा झळकली आहे. राहुल महाजनच्या स्वयंवरमध्ये देखील निकुलचा समावेश होता.

मेघना मलिक
हरियाणाच्या सोनिपतमध्ये जन्मलेली मेघना मलिक हिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.’ ना आना इस देश लाडो’ या मालिकेत तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. देहलिज या मालिकेत ती काम करताना दिसत आहे. शिवाय ती झलक दिखला जा, गुस्ताख दिल, अस्तित्व एक प्रेम कहाणी या मालिकेत दिसली होती. सोबतच तारे जमीन पर आणि कुछ ना कहो या चित्रपटात देखील तीने अभिनय केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.