‘प्यार का पंजनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवणारी नुसरत भरुचा (Nusarat Bharucha) आज चांगल्या अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. नुसरतने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. नुसरतचा जन्म प्रयागराज (अलाहाबाद) येथे झाला. नुसरत आज चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असेल, पण तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली होती. नुसरतने 2002 मध्ये टीव्ही सीरियल ‘किटी पार्टी’मध्ये काम केले होते. या टीव्ही शोमध्ये ती अवघ्या काही आठवड्यांसाठी दिसली होती. यानंतर नुसरतने टीव्ही शो ‘सेव्हन’मध्ये काम केले.
टीव्ही जगताला अलविदा म्हणत नुसरतने बॉलिवूड चित्रपटांकडे आपले लक्ष वळवले. नुसरतने ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांचा हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत, पण नंतर ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरतचे नशीबच बदलून टाकले.

नुसरत दिग्दर्शक विशाल फुरियाच्या ‘छोरी 2’ या चित्रपटात दिसणार आहे. हा आगामी बॉलिवूड हॉरर ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात नुसरतशिवाय सोहा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लग्नामुळे ट्रोल केल्याने भडकला अब्दू रोजिक; म्हणाला, ‘मला खुश राहण्याचा अधिकार नाहीये का?’
‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी झाली 10 वी पास, CBSE बोर्डातून मिळाले 83 %