Tuesday, September 26, 2023

‘गदर 2’च्या रिलीज दिवशीच चाहत्यावर भडकला ‘तारा सिंग’, नेटकरी म्हणाले, ‘जनतेसोबत वाईट वागला, तर…’

बॉलिवूडचा पॉवरफुल अभिनेता सनी देओल याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सनीने त्याचा अभिनय आणि डायलॉग्जने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सनीचा ‘यह ढाई किलो का हाथ जब उठता है न, तोह इंसान उठता नहीं… उठ जाता है’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. अशात सनी देओल ‘गदर 2‘ सिनेमामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमाला सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. मात्र, अशातच सनी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो नियंत्रण गमावताना दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल
सनी देओल (Sunny Deol) नेहमी हसताना किंवा अनेकदा भावूक असल्याचे दिसतो. मात्र, चाहत्याने त्याला इतके जास्त रागावताना कदाचित पहिल्यांदाच पाहिले असेल. व्हिडिओत सनी विमानतळावर असल्याचे दिसत आहे. एक चाहता त्याच्याकडे धावत सेल्फी घेण्यासाठी येतो. सनीचा बॉडीगार्ड त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण तो कसाबसा अभिनेत्याकडे पोहोचतो. ज्यावेळी तो सेल्फी घेऊ लागतो, तेव्हा सनी देओल त्याच्यावर रागावत (Sunny Deol Angry) असल्याचे दिसत आहे. आता सनीचे यादरम्यानचे एक्सप्रेशन्स सर्वत्र व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘तारा सिंग’ ट्रोल
‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमात ‘तारा सिंग’ (Tara Singh) पात्र साकारणाऱ्या सनीच्या या अंदाजामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आम्ही तुमची इज्जत करतो सर, पण जर जनतेसोबत काहीही वाईट वागलात, तर चांगले होणार नाही.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “पाजीला राग आला.” तसेच, आणखी एकाने लिहिले की, “घमंड… अच्छा…”

‘गदर 2’ सिनेमाविषयी
‘गदर 2’ सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर हा 2001मध्ये रिलीज झालेल्या गदर सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे, या सिनेमाची लाखो तिकीटे विकली गेली आहेत. या सिनेमात सनीव्यतिरिक्त अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. (film gadar 2 sunny deol loses his cool as fan tries to take photo video goes viral)

महत्त्वाच्या बातम्या-
पैसा कमावण्यासाठी ‘Adipurush’च्या निर्मात्यांनी खेळला मोठा डाव; एक नाही तर 2 OTTवर रिलीज केला सिनेमा
सेन्सॉर बोर्डाची कात्री अन् वादात अडकूनही ‘OMG 2’ने जिंकली प्रेक्षकांची मने, देशभरातून होतंय कौतुक
राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा! 2020मध्ये झालेल्या गर्भपाताविषयी म्हणाली, ‘5 महिन्यांच्या प्रेग्नंसी…’

हे देखील वाचा