मराठीसह हिंदी मालिकेतही आपल्या अभिनयाचे झेंडे गाडणारी अभिनेत्री म्हणजे, मराठमोळी रुची सवर्ण (Ruchi Savarn) होय. मालिका असो किंवा चित्रपट, आपल्या वाखण्याजोग्या अभिनयाच्या जोरावर तिने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. या सिनेसृष्टीत असे मोजकेच कलाकार आहेत, जे कमीत कमी प्रोजेक्ट्समध्ये काम करून नावारूपाला आले आहेत. रुचीची गणना अशाच कलाकारांमध्ये केली जाते. गुरुवारी (२६ मे) अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या करिअरबद्दल…
रुचीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात अभिनेत्री म्हणून नाही, तर असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. मात्र नंतर तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकेत काम करू प्रसिद्धी मिळवली. रुची पहिली हिंदी मालिका २००९ साली मिळाली. जिचे नाव ‘प्यार का बंधन’ होते. यात तिने राधा नावाच्या मुलीची भुमिका साकारली होती. नंतर पुढच्याच वर्षी तिला ‘तेरे लिये’ ही हिंदी मालिका मिळाली.
अभिनेत्रीने ‘घर आजा परदेसी’, ‘अजीब दास्तां है ये’, ‘तमन्ना’, आणि प्रसिद्ध ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’ अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच तिने ‘झुंज मराठमोळी’, ‘सखी’ आणि ‘सख्या रे’ या मराठी मालिकेत भुमिका साकारल्या. इतकेच नव्हे, तर रुचीने ‘फियर फाईल्स’ आणि ‘क्राईम पेट्रोल’सारख्या गंभीर शोमध्ये देखील काम केले आहे.
रुची सवर्ण सर्वात पसंत केलेली आणि गाजलेली भुमिका म्हणजे, महाराणी सोयराबाई. अभिनेत्रीने ‘फत्तेशिखस्त’ आणि ‘पावनखिंड’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महाराणी सोयराबाईंची भुमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. यातील तिच्या भुमिकेने तिला एक नवीन ओळख मिळवून दिली.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘कुमकुम भाग्य’मधील तिच्या सहकलाकाराच्या प्रेमात पडली आणि पुढं त्याच्यासोबतच संसार थाटला. २ डिसेंबर २०१५ साली रुची सवर्णने अभिनेता अंकित मोहनशी लग्न केले. तर ७ डिसेंबर २०२१ रोजी या जोडप्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आपल्या मुलाचे नाव त्यांनी ‘रुआन’ असे ठेवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा