Tuesday, April 16, 2024

इन्शाअल्लाह आणि पावसाआधीचा पाऊस! स्पृहा जोशीने शेअर केलं तिचं आवडतं पुस्तक

स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी सिने जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने स्पृहाने चित्रपट क्षेत्रात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. चित्रपटांमधील अभिनयाप्रमाणेच स्पृहा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. स्पृहा एक हरहुन्नरी महिला तर आहेच, त्यासोबतच ती एक प्रतिभावान अभिनेत्रीसुद्धा आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरुन ती नेहमीच तिच्या नवनवीन कविता प्रेक्षंकाना ऐकवत असते. 

नुकतीच तिने ‘माय बुकशेल्फ’ नावाची एक सिरीज सुरू केली आहे. यामध्ये ती तिच्या शेल्फमधील आणि काही आवडीची पुस्तके प्रेक्षकांसमोर सादर करत असते. अशातच अभिनेत्रीने या सिरीजचा एक व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर सुरू केला आहे. यात स्पृहा सांगते की, तिला अत्यंत आवडलेलं एक पुस्तक ती आता वाचून दाखवणार आहे. यावेळी अभिनेत्रीच्या हातात एक ‘गोल्डा’ नावाचं पुस्तक दिसत आहे.

या पुस्तकाबद्दल सांगताना स्पृहा म्हणते की, “वीणा गवाणकरांचं मला अत्यंत आवडलेलं पुस्तक आहे, ‘गोल्डा- एक अशांत वादळ.'” या पुस्तकात इस्राईलच्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांची कहाणी सांगण्यात आली आहे. तसेच लेखिका वीणा गवाणकरांबद्दल बोलताना अभिनेत्री सांगते की, “जशी आपली आजी गोष्ट सांगताना अगदी सोप्या भाषेत सांगते आणि आपल्याला ती आवडू लागते. तसंच वीणा यांचं आहे.” पुढे अभिनेत्री या पुस्तकाचं शेवटचं पान प्रेक्षकांना वाचून दाखवते.

अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या युट्यूब चॅनेलवरुन अनेक नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या सुंदर कविता आणि शब्दरचना प्रेक्षकांनाही प्रचंड आवडत असतात. स्पृहाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून, प्रेक्षकही त्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा