Sunday, June 4, 2023

पुतळाबाईंची भूमिका साकारून नावारूपाला आलेल्या पल्लवी वैद्यचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास

मराठी सिनेसृष्टीत असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्टमधून वाहवा मिळवली आहे. कधी कधी कलाकारांच्या वाट्याला अशी एखादी भूमिका येते कि आयुष्यभरासाठी ती भूमिका त्यांच्या नवी होऊन जाते. अशीच एका भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी वैद्य (pallavi vaidya). स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत पुतळा मातोश्री हे पात्र साकारून पल्लवी घराघरात पोहचली. तिला या भूमिकेने खूप प्रेम दिले. याव्यतिरिक्त देखील तिने अनेक भूमिका निभावल्या आहेत. गुरुवारी २६ मे रोज पल्लवी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत कधीही न ऐकलेल्या गोष्टी .

पल्लवीने ‘अगंबाई अरेच्चा’ (agbai arechha) या चित्रपटातून तिच्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने संजय नार्वेकर (sanjay narvekar)लहान बहिणीचे पात्र निभावले होते. अनेकांना आता ती आठवत देखील नसेल. या चित्रपटाचे सह दिग्दर्शक राहुल वैद्य (rahul vaidya) हे होते. यावेळी त्या दोघांचा ओळख झाली आणि मैत्री झाली. त्यांनतर त्याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी प्रेम विवाह केला.

लग्नानंतर देखील पल्लवीने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेत तिने छोटीशी भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर तिने ‘गर्फ’, ‘आभाळ झाले मोकळे’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिचा पती राहुलने माझा पती सौभाग्यवती, माझ्या नवऱ्याची बायको या प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

पल्लवीने चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya)या शोमध्ये देखील तिने काम केले आहे. तसेच मनमंदिरा गर्जना कीर्तनाचा या कार्यक्रमात देखील दिसली आहे. त्यानंतर देखील तिने अनेक छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा