Wednesday, July 3, 2024

‘वडील मला आणि आईला रोज मारायचे अन्…’, ‘असा’ आहे उर्फी जावेदचा थक्क करणारा जीवनप्रवास

आजकालच्या ग्लॅमरस दुनियत टिकायचं असेल तर खूप ऍक्टिव्ह असाव लागत. सतत बदलती फॅशन आणि बऱ्याच गोष्टी आपल्या बदल्याव्या लागतात. सिनेसृष्टीत पाहिले तर सर्व अभिनेत्री खूपच सुंदर आहे. त्या त्यांच्या हटके स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे उर्फी जावेद. उर्फी कधी काय करेल याचा काही नियम नाही. ती अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत येत असते. उर्फी अनेकदा वेगवेगळे कपडे परिधान करत असते. 15 ऑक्टोबर 1997 उत्तर प्रदेशातील लखनौ येथे जन्मलेल्या उर्फीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

उर्फी ( Urfi Javed ) ही आजच्या काळातील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या विचित्र आणि बोल्ड स्टाइलमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिच्या या यशाच्या मागे खूप संघर्ष आहे. उर्फीच्या वडिलांचे निधन झाल्यावर तिच्या आईने तिला एकटीनेच मोठे केले. उर्फीने लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने 2016 मध्ये “चंद्र नक्षत्र” या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती “कसौटी जिंदगी की” या मालिकेतून. या मालिकेत तिने “पाखी” ही भूमिका साकारली होती.

उर्फीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले. मात्र, तिच्या विचित्र आणि बोल्ड स्टाइलमुळे तिला नेहमीच ट्रोल केले जात होते. मात्र, उर्फीने या ट्रोल्सना न जुमानता आपली स्वतःची ओळख निर्माण केली. उर्फीने आपल्या करिअरमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने “डायन” आणि “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. उर्फी जावेद ही एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि यशाची कथा अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

ओटीटी बिग बॉसमध्ये आपली छाप पाडणारी टीव्ही अभिनेत्री उर्फी तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी आणि स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. उर्फीची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. इंस्टाग्रामवर तिला चार लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्याचबरोबर उर्फी तिचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवते.

उर्फी आता यशाच्या मार्गावर असली तरी तिच्यासाठी हे सर्व काही इतके सोपे नव्हते. याचा उल्लेख खुद्द उर्फीने एका मुलाखतीत केला होता. तिचे वडील तिला आणि आईला कसे मारायचे हे तिने सांगितले होते. उर्फी तिच्या पाच भावंडांपैकी दुसरे मूल आहे. उर्फीने सांगितले होते की, मी एक आत्मविश्वासपूर्ण मुलगी आहे, परंतु मला कोणतेही मित्र नाहीत. मी माझ्या लहानपणी खूप गोंधळलो होतो. मी माझ्या वडिलांच्या अगदी जवळची नव्हती.

उर्फीचे तिच्या वडिलांसोबत कधीच जुळली नाही. ते तिला रोज शिवीगाळ व मारहाण करायचे. या त्रासाला कंटाळून उर्फीने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. शेवटी कंटाळून ती घराबाहेर पडली. घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फीला खूप संघर्ष करावा लागला, तरीही तिने कधीही हार मानली नाही आणि आपले ध्येय साध्य केले. (On the occasion of famous actress Urfi Javed birthday know her life journey)

आधिक वाचा-
जिओ वर्ल्ड सेंटरच्या इव्हेंटमध्ये पोहचले आलिया आणि रणबीर, एकमेकांचा हात पकडून दिले कपल्स गोल
सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला हृदयविकाराने मृत्यू

हे देखील वाचा