Friday, May 24, 2024

मुग्धा आणि प्रथमेश यांच्या नात्यामध्ये नेमकं प्रपोज कोणी केल? गायिकेने केला खुलासा

सारेगमप लिटील चॅम्प‘ हा मराठी सिगिंग टीव्ही शो प्रचंड गाजला आहे. या शोमध्ये वेगवेगळे चेहरे दिसले. या शोमधील प्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनची जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्या दोघांनी त्याच्या चाहत्यांना गेल्या काही दिवसांपुर्वी आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून ते दोघे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. त्या दोघांनी त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

या शोमधील आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे (Prathesh Laghate) , रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांच्या आवाजाने संपुर्ण महाराष्ट्रला वेड लावले. त्यातील प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनची ( Mugdha Vaishampayan ) जोडी चांगलीच चर्चेत आली आहे. प्रथमेश आणि मुग्धा अनेकदा एकत्र दिसले. त्या दोघांनी अनेक कार्यक्रमात एकत्र गाणी गायली आहेत. त्यांच्या या त्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

एका व्हिडिओच्या माध्यामातून मुग्धाने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली आहे. मुग्धा म्हणाली की, “मी आणि प्रथमेश ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून एकमेकांना ओळखतो. त्या शोनंतर मी आणि प्रथमेशने अनेक कार्यक्रम एकत्र केले आहेत. मी आणि तो आगोदर खूप चांगले मित्र होतो. त्यामुळे आम्ही सतत एकमेकांसोबत वेळ घालवायचो. तेव्हा नकळत आम्हाला एकमेकांची सवय लागली. माझी आणि प्रथमेशची आधी म्युझिकल ट्युनिंग झाली आणि नंतर आमचे विचार जुळले. प्रथमेशने मला आधी प्रपोज केल होत. त्यानंतर आम्ही शांत विचार करून पुढचा निर्णय घेतला. आम्ही दोघे गेली चार वर्षी झाली एकमेकांना डेट करत आहे.”

त्याच वेळी मुग्धाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. काहीदिवसांपूर्वी मुग्धा गाण्याच्या कार्यक्रमासाठी पुण्यात गेली होती. त्यावेळी तिने जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी जेवताना तिला प्रथमेशची खूप आठवण येते. तेव्हा तिने सोशल माीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. (Prathesh Laghate and Mugdha Vaishampayan had been dating each other for the past ‘so many’ years)

अधिक वाचा- 
पैठणी साडीत प्रिया बापटचं फोटोशूट; पाहा फोटो
“मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय…” संकर्षण कऱ्हाडेची खास कविता व्हायरल; पाहा व्हिडीओ

हे देखील वाचा