ऑस्कर विजेता गुनीत मोंगा नुकत्याच ‘द कपिल शर्मा शो‘मध्ये दिसल्या. यादरम्यान त्यांनी ऑस्कर मिळाल्यानंतरची गोष्ट शेअर केली. खरं तर, आता गुनीत जिथे जातात तिथे त्या ऑस्करची ट्रॉफी सोबत घेऊन जातात. अशात या शोमध्ये, त्यांनी उघड केले की, कोणीही त्यांच्यासाेबत फोटो क्लिक करू इच्छित नाही, त्याऐवजी प्रत्येकाला ट्रॉफीसह फोटो क्लिक करायचे असतात.
कपिल शर्मा याने गुनीत मोंगा (guneet monga) यांना विचारले की, ‘जेव्हा तुम्ही ऑस्कर जिंकून परत आल्या तेव्हा तुमचे नातेवाईक भेटायला आल्यानंतर तुमच्यासाेबत फाेटाे काढतात की ऑस्कर ट्रॅफीसाेबत?’ यावर उत्तर देताना गुनीत म्हणाल्या की, “ट्रॉफीसह. मला वाटत की, कोणाला माझ्यासोबत फाेटाे नकाेसा आहे. प्रत्येकजण म्हणतो ही ट्रॉफी मला द्या, मग ते त्याच्यासोबत फोटो काढतात.” अशात कपिलने गुनीत यांचे कौतुक केले आणि म्हणाल्या की, “तुम्ही नसत्या तर ही ट्रॉफी कुठून आली असती.”
View this post on Instagram
यानंतर कपिलने गुनीत यांना विचारतो की, ‘त्या जेव्हा विमानतळावर जातात, तेव्हा त्यांना सिक्योरिटी चेकिंगशिवाय जाऊ दिले जाते का?’ यावर गुनीत म्हणाला की, “माझ्याकडे हे काळे कापड आहे, ज्याचा उपयाेग मी ट्रॉफी गुंडाळण्यासाठी करते. तुम्ही ते कसे गुंडाळले हे महत्त्वाचे नाही, ट्रॉफीचा आकार विचित्र आहे आणि तो एक्स-रे मध्ये दिसतो, म्हणून लोक मला ते काढण्यास सांगतात आणि मी त्यांना ते ऑस्कर असल्याचे सांगते. मात्र, ते तरीही म्हणतात आम्हाला ते पाहायचे आहे. मग मी त्यांना सांगते सर ते गुंडाळले आहे, पण ते म्हणतात काढून दाखवा, ज्यानंतर ते बघतात आणि मग त्याच्यासाेबत फाेटाे काढतात आणि त्यानंतरच मला पुढे जाण्याची परवानगी मिळते.”
गुनीत मोंगा यांनी भारताला ऑस्करचा गौरव मिळवून दिला आहे. त्यांनी 95व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म कॅटगरी ‘द एलिफंट व्हिस्पर्स’साठी ऑस्कर जिंकला. (oscar win guneet monga reveals everyone wants to take photos with oscar trophy nobody wants to click pic with me)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमृता खानविलकरने शेअर केला ‘मस्तानी’ लूक, फाेटाे व्हायरल
तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट